Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग गर्लफ्रेंड २३ मित्रांसोबत गेली डेटला, बिल पाहून बॉयफ्रेंड गेला पळून

गर्लफ्रेंड २३ मित्रांसोबत गेली डेटला, बिल पाहून बॉयफ्रेंड गेला पळून

Related Story

- Advertisement -

सध्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये डेटवर जाण्याची क्रेज मोठ्या प्रमाणात आहे. पण एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला डेट घेऊन जाणं महागात पडलं आहे. या तरुणाची गर्लफ्रेंड २३ मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन रेस्टॉरंटमध्ये डेटवर पोहोचली. पण या डेटचं बिल पाहून चक्कीत झालेला तरुणाने रेस्टॉरंटमधून फरारच झाला. ही घटना चीनची आहे.

वास्तविक चीनच्या झेजियांग प्रांतात सोशल मीडिया आणि फोनद्वारे एकमेकांच्या जवळ आलेल्या जोडप्याने ब्लाइंड डेट प्लॅन केला. यासाठी त्यांनी रेस्टॉरंट देखील ठरवले. ही दोघांची पहिलीचं डेट होती. तरुण वेळच्या आधीच रेस्टॉरंटमध्ये पोहोचला होता. तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्याची तयारी करत होता. पण या तरुणाची गर्लफ्रेंड डेटवर एकटी न येता ती तिच्यासोबत २३ मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन आली होती.

- Advertisement -

डेटच्या सुरुवातील सर्व काही ठीक होते. सर्वजण एकत्र भेटले आणि जेवले. यानंतर जेव्हा रेस्टॉरंटने तरुणाला बिल दाखवले तेव्हा ते बिल पाहून तरुण घाबरला आणि तो तिथून फरार झाला. तरुणाला जवळपास १९८०० युआन म्हणजे २ लाख १७ हजार रुपये बिल भरायचे होते. हेच बिल पाहून तरुणाच्या पाया खालची जमीन सरकली. तरुणाने त्यावेळेस पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे प्रेम जाणून घेण्यासाठी ब्लाइंड डेटवर तरुणी २३ मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन गेली होती. तरुण फरार झाल्यानंतर तरुणीला रेस्टॉरंटचे २ लाख रुपये बिल भरावे लागले. दरम्यान तरुणीने तरुणाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यानंतर तरुण २ टेबलाचे बिल देण्यास तयार झाला.


- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ शहराची लोकसंख्या फक्त २, तरीही सोशल डिस्टन्सिंगचे करतात पालन


 

- Advertisement -