घरट्रेंडिंगअबब! घरात सापडली ५०० वर्ष जुनी विहिर, बाहेर आल्या धक्कादायक वस्तू

अबब! घरात सापडली ५०० वर्ष जुनी विहिर, बाहेर आल्या धक्कादायक वस्तू

Subscribe

हे घर १८९५ च्या आसपास बांधण्यात आले

घरात पुरातन वस्तू सापडणे त्यात सोन्याचे हंडे सापडणे,जुनी हत्यारे सापडणे हे केवळ आपण सिनेमात किंवा गोष्टींच्या पुस्तकात वाचल किंवा पहिले असेल. असे म्हणतात की जमिनीच्या आत असलेली रहस्य कोणीही समजू शकत नाही. ज्या घरात माणसे आरामात राहत होती त्यांनाच आपल्या घरात इतकी जुनी सापडेल असे वाटले देखील नव्हते. मात्र एका घरात चक्क ५०० वर्ष जुनी विहीर आढळली आहे. या विहिरीत सापडलेल्या वस्तूंनी सर्वांची झोप उडवली आहे. एक दिवस घराची साफसफाई करत असताना अचानक घरातील एका फरशीवर लक्ष गेले. तिथे काहीतरी असल्याचा संशय आला आणि घरातील सदस्यांनी तिथे खोदकाम केले असता त्यांना ५०० वर्ष जुनी विहीर सापडली. (500-year-old well found in the house in Plymouth England)

- Advertisement -

ही घटना आहे इंग्लंडच्या प्लाईमाउथ येथे राहणाऱ्या ७० वर्षीय कॉलिन स्टीयर यांच्या घरातील. ७० वर्ष एका घरात राहून त्यांना आपल्या घरात इतकी मोठी विहिर सापडेल असे वाटले नव्हते. त्यांते हे घर १८९५ च्या आसपास बांधण्यात आले होते. त्यानंतर जवळपास १९८८ साली ते या घरी शिफ्ट झाले. दर दहा वर्षांनी ते त्यांच्या घराची नव्याने सजावट करतात. असेच काम करत असताना त्यांना घराच्या खिडकीजवळ असणाऱ्या फरशीकडे लक्ष गेले. त्यांना ती फरशी थोडी खराब आणि खाली दबल्यासारखी वाटली. या फरशीखाली कोणाला तरी पुरले असावे असा संशय त्यांना आला. त्यामुळे मनातील शंका दूर करण्यासाठी त्यांनी ती जागा खोदण्याचा निर्णय घेतला. फरशी काढून तिथे खोदकाम केल्यानंतर त्यांना एक खड्ड दिसला. त्यात जुनी तलवार, १७२५ सालातील नाणी आणि अंगठ्या सापडल्या. हा खड्डा आणखी खोल असू शकतो म्हणून त्यांनी आणखी खोदकाम केले असता ५००वर्ष जुनी विहिर असल्याचे समोर आले.

द सन या वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही विहिर जवळपास १७ फूट खोल आणि जवळपास ४-५ फुट रुंद आहे. पाच फुटांपर्यत खोदकाम केले असता त्यांना तलवार सापडली. १७ फूट खोल खोदकाम केल्यानंतर विहिरीला पाणी लागले. विहिरीला लागलेल्या पाणी बाहेर काढून ते टेस्टसाठी दिले असता हे पाणी पिण्यासाठी चांगले असल्याचे समोर आले.

- Advertisement -

हेही वाचा – प्रियकराने दिला नकार, गिफ्ट दिलेली २३ लाखांची बाईक पेटवून घेतला प्रेयसीने बदला

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -