घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट5G मोबाईल टॉवरमधून कोरोनाचा फैलाव? घाबरून कर्मचाऱ्यांची धरपकड!

5G मोबाईल टॉवरमधून कोरोनाचा फैलाव? घाबरून कर्मचाऱ्यांची धरपकड!

Subscribe

आजकाल कोरोनाची भिती माणसाला काय काय करायला लावेल, याचा काही नेम नाही. त्यासोबतच सोशल मीडियावर आणि ऐकोऐकी पसरणाऱ्या अफवांचं भरमसाठ पीक या काळात निघालं आहे. त्यामुळे इतर महत्त्वाच्या बाबींसोबतच अनेक गैरसमज देखील या काळात लोकांमध्ये पसरले आहेत. त्याचाच एक धम्माल नमुना नुकताच अनुभवायला मिळाला. मोबाईलच्या 5G टॉवररमधून कोरोनाचा विद्युत लहरींद्वारे फैलाव होतो, या भितीपोटी हा मोबाईल टॉवर बसवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचीच स्थानिकांनी धरपकड केल्याची अजब घटना समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली!

काय झालंय ते कर्मचाऱ्यांना कळेचना!

हा प्रकार घडला आहे पेरू या देशात. पेरूच्या अकोबांबा प्रांतातल्या एका गावात गिलाट पेरू कंपनीचे काही कर्मचारी मोबाईलच्या 5G रेंजचे टॉवर बसवण्याच्या कामात व्यस्त होते. अचानक तिथे मोठ्या संख्येने स्थानिक गावकरी हजर झाले. या कर्मचाऱ्यांना काही कळायच्या आतच या गावकऱ्यांनी आणलेल्या लाठ्याकाठ्यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना खाली उतरवलं आणि त्यांची धरपकड केली. नक्की झालंय काय, याचा काही उलगडा या कर्मचाऱ्यांना आणि कंपनीच्या अभियंत्यांना होईना. अखेर त्यांच्याचल्या एकानं या गावकऱ्यांशी बोलल्यानंतर खरा प्रकार उघड झाला!

- Advertisement -

‘सगळे अँटिना काढा, मगच सोडू’

पेरूची राजधानी लिमापासून किमान ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावापर्यंत कोरोना विषाणूची बातमी जरी पोहोचली असली, तरी त्याची लक्षणं आणि प्रवासाची प्रक्रिया मात्र अद्याप पोहोचली नव्हती. त्यामुळे जेव्हा हे कर्मचरी तो टॉवर उभा करायला लागले, तेव्हा या गावकऱ्यांना वाटलं, की या टॉवरच्या माध्यमातून गावात विद्युत चुंबकीय लहरींमधून कोरोनाचा विषाणू पसरवला जाणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊन त्यांनी या ८ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. जोपर्यंत गावात लावलेले सगळे अँटिना काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत सोडणार नसल्याचं या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं. अखेर गिलाट कंपनीच्या प्रतिनिधींनी या गावकऱ्यांची बोलणी सुरू केली असून त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -