आजकाल सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. सोशल मीडियाचा जसा वाईट कामासाठी वापर करता येतो तसाच चांगल्या कामासाठीही वापर करण्यात येतो. आपल्याकडे असलेले कोणत्याही क्षेत्रातील कौशल्य सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगासमोर आणू शकतो. असंच एका ६ वर्षांच्या चिमुकलीने तिच्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करुन तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तिच्या या डान्स व्हिडिओची दखल अमेरिकन अॅक्टर क्रिस इव्हान्स आणि विल्स स्मिथने घेतली आहे.
Rare footage of me as a child ?? pic.twitter.com/ArnB5PVmc5
— |L I Z Z O| (@lizzo) June 7, 2019
या ६ वर्षांच्या मुलीचे नाव इव्हाना कॅम्पबेल आहे. ती मूळची आफ्रिकेच्या पोर्ट एलिझाबेथ येथील आहे. ही ६ वर्षांची मुलगी एक उत्कृष्ट डान्सर आहे. इव्हाना कॅम्पबेलच्या डान्सचा व्हिडिओ टि्वटरवर व्हायरल झाला आहे. १ लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच २० हजार लोकांनी रिटि्वट केला आहे.
Rare footage of me as a child ?? pic.twitter.com/ArnB5PVmc5
— |L I Z Z O| (@lizzo) June 7, 2019
इव्हानाच्या डान्स व्हिडिओची क्रिस इव्हान्सने दखल घेतली आहे.
This kid is cooler than I could ever hope to be. https://t.co/ZsDvdBxKts
— Chris Evans (@ChrisEvans) June 8, 2019
तसेच विल स्मिथने देखील इव्हानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इव्हाना कॅम्पबेल हिचे इन्स्टाग्रामवर देखील अकाऊंट आहे. इन्स्टाग्रामला तिचे १ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.