Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग शंभर रूपयांसाठी सात दिवस ना आरडाओरडा,ना रडणं, ६ वर्षांच्या लेकाने वडिलांसोबतच केले...

शंभर रूपयांसाठी सात दिवस ना आरडाओरडा,ना रडणं, ६ वर्षांच्या लेकाने वडिलांसोबतच केले कॉन्ट्रॅक्ट

Subscribe

वडिलांनी पहिल्यांदा मुलासोबत १० रुपयांची अग्रीमेंट केली होती. मुलगा जर एक दिवस रडला नाही, तो कोणताही आरडा न करता राहिला तर त्याला दहा रुपये मिळणार. जर मुलाने संपूर्ण आठवडा हे फॉलो केले तर मुलाला शंभर रुपये देण्याचे मान्य केले.

लहान मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी पालक काय काय करतील आणि काय नाही हे आपल्या सर्वानांच ठावूक आहे. मुलांना देखील त्यांना जे हवे आहे ते मिळवण्यासाठी काय करायचे हे अगदी बरोबर ठावूक असते. अलिकडेच आई वडिलांनी मुलांशी कसे वागावे हे सांगणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तु माझ्याशी निट वाग माझा सर्वांसमोर अपमान करू नकोस असे ती चिमुरडी आपल्या आईला सांगत होती. हल्लीच्या मुलांना काय आवडते आणि काय नाही हे कोणाला ठामपणे सांगता येणार आहे.

आजकालच्या हट्टी मुलांना वठणीवर आणण्यासाठी आणि त्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांचे पालक देखील तितकेच शातीर झाले आहेत. एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका सहा वर्षांच्या मुलाला चांगल्या सवयी लावण्यासाठी वडिलांनी थेट मुलाशी कॉन्ट्रॅक्ट केलाय. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

- Advertisement -

@Batla_G या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यात एका सहा वर्षांच्या मुलासोबत वडिलांनी १०० रुपयांचे कॉन्ट्रक्ट केले आहे. सलग सात दिवस न रडता, आरोडाओरडा करता, भांडण न करता राहिल्यास १०० रुपये देण्याचे हे कॉन्ट्रॅक्ट आहे.  7 दिवस न रडणे, आरडाओरडा, भांडण न केल्याबद्दल 100 रुपये देण्याच्या कॉन्ट्रॅक्ट वर मी नुकत्याच सह्या केल्या आहेत असे म्हणत मुलाच्या वडिलांनी हँड रिटर्न अग्रीमेंटचा फोट शेअर केला आहे.

वडील आणि मुलीचे हे कॉन्ट्रॅक्ट फारच मजेशीर आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अगदी मुलाच्या उठण्यापासून झोपेपर्यंत, दुध पिण्यापासून जेवणापर्यंतचा तपशील देण्यात आला आहे. मुलाच्या दैनंदिन वेळापत्रकाचा तपशील वाचून नेटकऱ्यांनाही हसू आवरले नाही.

- Advertisement -

 

६ वर्षांच्या लेकाने वडिलांसोबतच केलेले कॉन्ट्रॅक्ट एकदा पाहाच 

वडिलांनी पहिल्यांदा मुलासोबत १० रुपयांची अग्रीमेंट केली होती. मुलगा जर एक दिवस रडला नाही, तो कोणताही आरडा न करता राहिला तर त्याला दहा रुपये मिळणार. जर मुलाने संपूर्ण आठवडा हे फॉलो केले तर मुलाला शंभर रुपये देण्याचे मान्य केले.

वडिलांनी या कॉन्ट्रॅक्टमध्ये शाळेच्या वेळेत सकाळी उठण्यासाठी अलार्मची वेळ देखील दिली आहे. अलर्ट अलार्मनंतर १० मिनिटांनी उठायचे.आंघोळीची वेळ सकाळी दुध पिण्याची वेळ, टीव्हीपाहणे, नाश्ता, दुपारचे जेवळ, रात्रीचे जेवण या सगळ्याचे वेळापत्रक असलेले एक कॉन्ट्रॅक्ट तयार केले आहे. मुलाल शिस्त लावण्यासाठी वडिलांनी केलेली ही भन्नाट कल्पना नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.


हेही वाचा –  Gangubai Kathiawadi trailer आधीच आला अजय देवगणचा लूक, म्हणाला- येतोय आम्ही

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -