घरट्रेंडिंगVideo: रोजंदारीवर काम करणाऱ्या ६० वर्षीय मजुराचा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ

Video: रोजंदारीवर काम करणाऱ्या ६० वर्षीय मजुराचा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ

Subscribe

एका लोकल फर्मच्या प्रमोशनसाठी मम्मिकने भारी सूट आणि हातात आयपॅड घेऊन फोटोशूट केले. फोटोग्राफर शारिकने मम्मिकमध्ये असलेले मॉडेलिंगचे स्किल ओळखले. त्याने सोशल मीडियावर मम्मिकाचे काही फोटो फोस्ट केले होते. मम्मिकाचा चेहरा अभिनेता विनायकन सोबत मिळता जुळता असल्याचे त्याचे फोटो अल्पावधीतच व्हायरल झाले.

एखाद्याचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. आज गरीब दिसणारा माणूस एका रात्रीत श्रीमंत होऊ शकतो. अशीच एक घडना घडलीये. केरळमधील एका रोजंदारी करणाऱ्या मजुरासोबत. विरलेली लूंगी आणि शर्टमध्ये दिसणारा एक मजूर अचानक सुपर ग्लॅमर मेकओव्हर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो. केरळच्या कोझिकोड येथे रोजंदारी करणाऱ्या ६० वर्षीय मम्मिकाचे एका रात्रीत नशीब पालटले.

एका लोकल फर्मच्या प्रमोशनसाठी मम्मिकने भारी सूट आणि हातात आयपॅड घेऊन फोटोशूट केले. फोटोग्राफर शारिकने मम्मिकमध्ये असलेले मॉडेलिंगचे स्किल ओळखले. त्याने सोशल मीडियावर मम्मिकाचे काही फोटो फोस्ट केले होते. मम्मिकाचा चेहरा अभिनेता विनायकन सोबत मिळता जुळता असल्याचे त्याचे फोटो अल्पावधीतच व्हायरल झाले.

- Advertisement -

त्यानंतर फोटोग्राफर शारिकला एक असाइनमेंट आली. त्यावेळी त्याला मम्मिकनचाच चेहरा समोर आला. त्याने मम्मिकनला गाठले आणि त्याला याची माहिती दिली. मम्मिक यासाठी तयार झाला. आर्टिस्ट मजनसने मम्मिकाचा मेकओव्हर केला. फोटोग्राफर शारिकने मम्मिकाचं अफलातून फोटोशूट केलं आणि ते सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालं.

- Advertisement -

मम्मिकाचे आयुष्य एका रात्रीत बदलले. त्याला मिळालेल्या यशात तो आनंदी आहे. मम्मिका आजही त्याची रोजंदारीची कामे करतो. त्याच्याकडे नोकरीच्या काही संधी येत आहे. मात्र त्याला मॉडेलिंगमध्ये पुढे काम सुरू ठेवायचे आहे.

मम्मिकाचे इन्स्टाग्रामवर एक पेज आहे. ज्यात तो त्याच्या रोजच्या सामान्य कपड्यांसोबतच मेकओव्हरचे फोटो देखील शेअर करत असतो. मम्मिका सध्या कोझीकोडच्या वेन्नक्कड, कोडिवल्ली येथील लोकांसाठी हिरो बनला आहे.


हेही वाचा – Valentine’s Day निमित्त मुंबई पोलिसांचं भन्नाट ट्विट, अन् जनजागृतीचा पोलीशी खाक्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -