घरट्रेंडिंग'आपली आजी'च्या गावराण रेसिपी सुपरहिट, यु्टूयबने दिलं सिल्व्हर बटन

‘आपली आजी’च्या गावराण रेसिपी सुपरहिट, यु्टूयबने दिलं सिल्व्हर बटन

Subscribe

स्मार्टफोनच्या उदयानंतर अनेक हौशींनी आपलं युट्यूब चॅनेल काढून आपल्यातली कला जगासमोर नेण्याचा प्रयत्न केला. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण युट्यूबवर आपल्या कलेचे सादरीकरण करत असतात. अहमदनगरच्या ७० वर्षीय आजीबाईंनी देखील युट्यूबवर आपलं चॅनेल काढून पाककला जगाला दाखविण्याचा प्रयत्न केला. आजीबाईंच्या या प्रयत्नाला युट्यूबवर लाखो लोकांनी पसंती दिलेली आहे. तर युट्यूबने देखील आजीबाईंची दखल घेत त्यांच्या चॅनेलला सिल्व्हर बटन देऊ केले आहे. त्यामुळे या आजीबाईंची चांगलीच चर्चा रंगली आहे. अंगात कला असेल तर ती लपून राहत नाही, हे वाक्य देखील पुन्हा एकदा सर्वांना पटले आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात राहणाऱ्या ७० वर्षीय सुमन धामने या युट्यूबवर ग्रामीण भागातील पदार्थ बनवून दाखवितात. मार्च २०१९ पासून त्यांनी ‘आपली आजी‘ या युट्यूब चॅनेलची सुरुवात केली. आपला नातू यश पाठकच्या मदतीने त्यांनी हे चॅनेल सुरु केल्याचे सांगितले. आजींनी सांगितले की, “युट्यूब काय असतं हे मला माहीत नव्हतं. मी बनवत असलेल्या पदार्थांचे व्हिडिओ काढून त्याच्यावर टाकायची कल्पना माझ्या नातूला सुचली. आता मलाही युट्यूब आवडायला लागलंय. लोकांना नवनवीन रेसिपी तयार करुन दाखवायला मजा येते.”

- Advertisement -

धामने आजी महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल ग्रामीण पदार्थ, तसेच पाव भाजी, वडा पाव असे नवे पदार्थ देखील आपल्या हटके स्टाईलने बनवतात. त्याचे व्हिडिओ युट्यूबवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. आजींच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात. आजींचा सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडिओ आहे कारल्याच्या भाजीचा. कारल्याची भाजी अजिबात कडू न होता कशी बनवायची, याची रेसिपी आजींनी दाखविली आहे. या व्हिडिओला ६० लाख व्ह्यूज मिळाल्या आहेत.

 

- Advertisement -

आपल्या आजीबद्दल सांगताना नातू यश म्हणाला की, “आम्ही लहानपणापासून आजीच्या हातचे पदार्थ खात आहोत. आम्हाला आजीच्या हातची चव फारच आवडते. मागच्यावर्षी आमच्या डोक्यात युट्यूब चॅनेल काढण्याचा विचार आला. सुरुवातीचे काही व्हिडिओ टाकताच आम्हाला तुफान प्रतिसाद मिळू लागला. मग आम्ही शेंगदाण्याची चटणी, हिरव्या भाज्या, गोड पदार्थ, वांग्याचे भरीत अशी मातीतली पारंपरिक पदार्थांच्या रेसिपीज टाकायला सुरुवात केली. आज सर्व व्हिडिओंना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.”

 

ऑनलाईन ऑर्डरही घेतात आजी

आजींच्या व्हिडिओंना लोक पसंती देत असतानाच व्हिडिओच्या खाली कमेंट करत एखादा पदार्थ बनवून दाखविण्याची फर्माईश देखील करतात. आजी देखील काही पदार्थ प्रेक्षकांच्या इच्छेखातर बनवून दाखवितात. सणांच्या निमित्ताने आजी त्या त्या सणांना खास पदार्थ बनवितात. तसेच दिवाळीसाठी त्यांनी ऑनलाईन फराळाची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच ‘आजी मसाले’ ब्रँडही तयार करण्यात आला आहे. 8888758452 या नंबरवर व्हॉट्सअप करुन तुम्ही ऑर्डर देऊ शकता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -