घरट्रेंडिंगExpo 2021 in Dubai: इतिहासकार बेनॉय के. बेहेल ७०० वर्षांपूर्वीची बुद्धकालीन चित्रकारी...

Expo 2021 in Dubai: इतिहासकार बेनॉय के. बेहेल ७०० वर्षांपूर्वीची बुद्धकालीन चित्रकारी जगासमोर आणणार

Subscribe

दक्षिण आशियात बुद्धकालीन चित्र परंपरा ही चित्रकलेच्या क्षेत्रातील एक वैभवशाली परंपरा आहे हे अजून जगाला ज्ञात नाही कारण आापयत ते तसं चित्रकलेची एक महत्त्वाची शाखा हणून जगासमोर आली नाही.
दुबई येथील एक्सपो,२०२० मधील भारतीय पँहेलीयन मध्या कलेतील इतिहासकार बनॉय के. बेहेल यांच्या केलेल्या कलात्मक प्रदर्शनाद्वारे बदलणार आहेत. ८ डिसेंबर,२०२१ मध्येआखणी केलेल्या प्रदर्शनात जगभरातल्या प्रतिष्ठांना
या कलाकृतीची ओळख होईल. हा सोहळा प्रत्यक्ष सभा मंडपात साजरा होणार आहे आणि निवडक प्रतिथयश अतिथी ,
माननीय पाहुणे आभासी माध्यमातून या सोहयाळ्साठी उपस्थित राहणार आहेत. अगदी पूर्वी केलेली म्हणजेच प्राचीन काळातील इसवी पूर्व दुसऱ्या शतकातील बुद्धकालीन चित्र भारताल्या अजंठा लेण्यांमध्ये आहेत. ही चित्र अतिशय उच्च दर्जाची असून देखील या कडे जगाचं लक्ष गेलं नव्हतं. कारण ती फार पू्र्व अगदी २०व्या शतकात दगडात कोरलेली होती. बेनॉय के. बेहेल यांनी पहिल्यांदा या चित्रांचा परिश्रमपूर्वक जीर्णोद्धार करुन जगासमोर आणली.

 

- Advertisement -

इसवी सन पाचव्या शतकात खर्या अर्थाने भारतात आणि श्रीलंकेत बुद्धकालीन चित्रांचा चांगला काळ होता असं म्हणता येईल. बेहेल यांनी अजंठा,पितळखोरा आणि बाघ या ठिकाणच्या जागतिक दृष्टीने महत्त्वाच्या चित्रांत खूप काळजीपूर्वेक दुरुस्ती व डिजिटल दस्त ऐवजीकरण केलं. ही परंपरा श्रीलंकेच्या आसपासच्या प्रदेशांतही विस्तारल्याचे कळते. श्रीलंकेतील सिगीरीया गुहेतील ५व्या दशकातील चित्रांचंही दस्त ऐवजीवकरण करण्यात आले आहे.

या पायाभूत कामातून कलेचे इतिहासकार आणि छायाचित्रकार बेनॉय के बेहेल यांनी प्राचीन बुद्धकालीन चित्रांचं जगातलं पहिलं सादरिकरण कले आहे जे जगातील कला आणि सांस्कृतिक इतिहासात बदल घडवेल कारण या निमित्ताने ७०० वर्षापूर्वीची बुद्धकालीन चित्रकारी जगासमोर येणार आहे.

- Advertisement -

या बुद्धकालीन चित्रांमुळे प्राचीन काळातील समृद्ध चित्रकलेचा नमुना जगात इतरत्र आढळून येईल.या चित्रांमधून त्या काळातील दया,करुणा या माणूसकीने वागणाऱ्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन होईल या शब्दांत बेहेल यांनी चित्रांचे वर्णन केले. या अनमोल कलेचं त्यांच्या अस्सल रंगांमध्ये तपशीलासह चित्रीकरण करणारे बेहेल हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. शतकांपूर्वीच्या या श्रेष्ठ चित्रांमधल्या काही नग्न, तुटलेल्या अवशेषांचंही जतनही बेहेल यांनी केले आहे. sapio Analytics मधील जीर्णोद्धार विभाग ही शासकीय सल्लागार समिती भारतासारख्या विकसनशील देशाच्या वतीने सादरीकरण करणार आहे.

 

पुरातन भारतीय संस्कृतीचा संरक्षक आणि सादरकर्ता म्हणून जगासमोर हे प्रदर्शन करण्यासाठी निवड झाल्याबद्दल sepio हेरिटेजला अभिमान वाटत आहे. जगभरात अशा प्रकारे पुरातन बुद्धकालीन चित्रांचे प्रदर्शन प्रथमच भरवले जात आहे. हे प्रदर्शन जणू मैलाचा दगड असेल जे जगातल्या बुद्ध कालीन चित्रांना जगासमोर आणेल. यात आम्ही श्रेष्ठ बुद्धकालीन चित्रेकलेचे मूळ संकल्पना सर्वांना अवगत करुन देणार आहोत असे sapio analyticsचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – मूनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘आरसा’ लघुपटासाठी अभिनेत्री श्वेता पगारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -