Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग वयाच्या ९ व्या वर्षी सर्वात लांब दुधाचा दात; कॅनडाच्या चिमुकल्याचा अनोखा गिनीज...

वयाच्या ९ व्या वर्षी सर्वात लांब दुधाचा दात; कॅनडाच्या चिमुकल्याचा अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड!

Subscribe

कॅनडामध्ये राहणारा ल्यूक ठरतोय भाग्यवान...

लहान मुलांना दात येणं किंवा त्यांचे दुधाचे दात तुटणं ही प्रक्रिया चिमुकल्यांसाठी खूप वेदना दायक असते. तर दुसरीकडे जगभरात काही चिमुकल्यांचं असंही म्हणणं असतं की, त्यांनी त्यांचा तुटलेला दुधाचा दात रात्री झोपतांना उशीच्या खाली ठेवला तर रात्री स्वप्नात परी येईल आणि त्या तुटलेल्या दाताच्या जागी ती परी काहीतरी भेट देऊन जाईल. मात्र हे सगळं काल्पनिक आणि स्वप्नवत असल्याने ऐकण्यास थोडं गंमतीशीर वाटतं आणि ते कधी सत्यातही उतरत नाही. पंरतु कॅनडामध्ये असणाऱ्या ल्यूक नावाच्या वयवर्ष ९ असणाऱ्या एका मुलाला भाग्यवान मानलं जातं आहे, कारण त्याला एक अनोखं गिफ्ट मिळालं आहे. ते गिफ्ट म्हणजे त्याने त्याच्या दुधाच्या तुटलेल्या दातामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. त्याच्या दाताला आतापर्यंत असलेल्या दुधाच्या दातापैकी सर्वात लांब दुधाचा दात असल्याचे सांगितले जात आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंद करणाऱ्या ल्यूक या मुलाच्या दाताची लांबी २.६ सेमी आहे. लूकने ओहियोमध्ये राहणाऱ्या १० वर्षाच्या कर्टीस बैडी या मुलाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे. कर्टीस बैडी या मुलाच्या दुधाच्या दाताची लांबी २.४ सेमी होती, तर ल्यूकच्या दाताची लांबी २.६ सेमी अशी आहे.

- Advertisement -

२०१९ साली डॉ. क्रिस मॅकआर्थर नावाच्या डेंटिस्टने ल्यूक ८ वर्षांचा असताना त्याच्या दाताला काढले होते. परंतु त्यांनी तो दात जपून ठेवला. हा दात जपून ठेवण्याचे कारण म्हणजे या दाताची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात यावी. काही दिवसांपूर्वीच ल्यूकच्या दुधाच्या दाताने नवा रेकॉर्ड केला असल्याची माहिती मिळत आहे. ल्यूकच्या या अनोख्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुळे ल्यूकचे सर्वच कौतुक करत आहे. ल्यूकचे वडील क्रेग बोउल्टनने एका मुलाखतीत यासंदर्भात असे सांगितले की, या दाताचा विचार करणं इकतं महत्त्वाचं वाटलं नव्हतं, परंतु त्यांचा नवा दात या दुधाच्या दातावरच येत असल्याने ल्यूकला खाण्या-पिण्यासह बोलणं देखील कठीण होत असल्याने त्याला दातांच्या डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ल्यूकचा हा दात काढण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी ल्यूकचा दुधाचा दात सर्वात लांब असल्याचे सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -