घरट्रेंडिंगझाडावर एक पक्षी बसलाय, पण सापडत नाहीये; तुम्ही त्याला शोधून दाखवाच

झाडावर एक पक्षी बसलाय, पण सापडत नाहीये; तुम्ही त्याला शोधून दाखवाच

Subscribe

ज्याने हे छायाचित्र क्लिक केले, त्याने ते अतिशय हुशारीने टिपले आहे. कारण झाडावर बसलेला पक्षी अजिबात दिसत नाही. पहिल्या दृष्टीक्षेपात तुम्हाला हे संपूर्ण झाड दिसेल. त्यानंतर बारीक नजरेनं पाहिल्यानंतर तुम्हाला तो पक्षी पाहायला मिळेल.

नवी दिल्लीः Optical Illusion Viral Photo : इंटरनेटवर दररोज ऑप्टिकल इल्युजनची छायाचित्रे व्हायरल होत असतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. बहुतेक चित्रे अशी आहेत, ज्यातून आपल्याला काही तरी शोधायचे असते. नुकताच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अजगर पाहायला मिळत होता. आता आणखी एक फोटो व्हायरल झालाय, ज्यामध्ये एक पक्षी लपलेला दिसतोय. या चित्रातील पक्षी शोधणे सोपे काम नाही. आपल्याला चित्रावर आपले डोळे स्थिर करावे लागतील आणि मन लावून तो फोटो पाहावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तो पक्षी सापडणार आहे.

तुम्हाला झाडावर पक्षी दिसला का?

अनेकदा अशाच प्रकारचे ऑप्टिकल इल्युजनचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होते, ज्यामध्ये प्राणी किंवा पक्षी शोधावे लागतात. यावेळीही तुम्हाला मन लावून ते चित्र पाहावे लागेल. आपण चित्रात पाहू शकता की, झाडाच्या फांद्यावर काही पाने दिसतात. झाडाच्या फांद्यावरील जवळपास सर्वच पाने गळून पडली आहेत. ज्याने हे छायाचित्र क्लिक केले, त्याने ते अतिशय हुशारीने टिपले आहे. कारण झाडावर बसलेला पक्षी अजिबात दिसत नाही. पहिल्या दृष्टीक्षेपात तुम्हाला हे संपूर्ण झाड दिसेल. त्यानंतर बारीक नजरेनं पाहिल्यानंतर तुम्हाला तो पक्षी पाहायला मिळेल.

- Advertisement -

ऑप्टिकल इल्युजन हे चित्र आश्चर्यचकित करणार

जेव्हा आपण आपले डोळे चित्रावर केंद्रित कराल तेव्हा हळूहळू लक्षात येईल की, झाडावर एक पक्षी बसला आहे. पक्ष्याचा रंग झाडाच्या रंगाशी मिळता-जुळता आहे. त्यामुळे त्या पक्षाला शोधणं कठीण आहे. जर तुम्हाला चित्रातील पक्षी शोधायचा असेल तर तुम्ही चित्राच्या सुरुवातीच्या फांद्या पाहाव्या लागतील. त्या फांद्याकडे निरीक्षण करून पाहिल्यानंतर पक्षी उजवीकडे बघताना दिसेल. त्याने डोळे मिटून ठेवले असल्याचंही आपल्याला भासेल. त्यामुळेच झाडावर पक्षी सहज शोधणे शक्य होणार असले तरी ते कठीण काम आहे. अशा प्रकारचे अनेक फोटो दररोज व्हायरल होत असतात.
Optical Illusion


हेही वाचाः Viral Video : लाकडावर बसलेल्या कबुतराला मांजर पकडणार, तेवढ्यात झालं असं काही…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -