Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग खाण्यासाठी काय पण... 'या' शहरात पहाटे ४ वाजता करतात नाश्ता!

खाण्यासाठी काय पण… ‘या’ शहरात पहाटे ४ वाजता करतात नाश्ता!

Subscribe

प्रत्येक राज्यात, देशात त्यांच्या संस्कृतीसह खाण्या-पिण्याच्या सवयीत विविधता असल्याचे दिसून येते. थायलंडच्या खाद्य संस्कृतीची जगभरात चर्चा असून तेथील खाद्य संस्कृती जाणून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक थायलंडमध्ये आवर्जून जातात. अशातच थायलंडचं एक शहर खाद्य-संस्कृतीच्या बाबतीत वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे. येथील लोकं खाण्यासाठी काय पण… करू शकतात हे देखील आवर्जून उल्लेख करण्यासारखंच आहे. कारण थायलंडमधील त्रांग नावाच्या शहरात नाश्ता करण्यासाठी लोकं सुर्योदयापूर्वीच घराबाहेर पडतात आणि खाण्यासाठी तयार होतात. त्रांग शहरातील लोकं खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूपच शौकीन आहेत. थायलंडमधील लोकं दिवसातून तीन ते चार वेळा जेवण किंवा नाश्ता करणं पसंत करतात तर त्रांगमध्ये लोकं ८ ते ९ वेळा जेवण किंवा नाश्ता करत असल्याचे सांगितले जाते. डिम सम, रोस्ट पोर्क आणि डीप फ्राय डफ सारखे पदार्थ या शहरात खूप लोकप्रिय आहेत. इथल्या लोकांच्या खाण्य़ा-पिण्याच्या सवयींसह त्यांच्या निवडी बघून रेस्टॉरंटमध्ये कित्येक कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाते.

त्रांग शहरात असणाऱ्या रेस्टॉरंट चालवणाऱ्या Janjirdsakने बीबीसीशी बोलताना सांगितले की, त्रांग शहरातील बऱ्याच रेस्टॉरंट्समध्ये २४ तास स्टाफची आवश्यकता भासते. असे सांगितले जाते की, त्रांग शहरातच्या आजूबाजूला रबर शेतीचा उद्योग आहे. या उद्योगामुळे, या रबरच्या शेतीत काम करणारे लोक पहाटे २ वाजता उठतात. शेती काम करण्यापूर्वी या लोकांचे सूर्यादयापूर्वी दोन वेळा जेवण देखील करून झालेले असते.

- Advertisement -

याशिवाय जे लोकं रेस्टॉरंट चालवतात ते नाश्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी पहाटे ४ वाजतात घराबाहेर पडतात. तर लहान मोठ्या हॉटेल्समध्ये शेफसह कर्मचारी पहाटे ३ वाजता उठून डीप फ्राय डफ बनवण्याच्या तयारीला लागतात. एवढेच नाही तर ते ५ वाजता तेथील लोकांना ब्रेकफास्ट सर्व्ह करण्यासदेखील सुरूवात करतात. आणि खाण्याचे शैकीन असणाऱ्या लोकांमुळे ७ ते ८ वाजेपर्यंत त्यांच्या रेस्टॉरंटमधील पदार्थ फस्त होत असल्याचे देखील सांगितले जात आहे. यासोबतच दिवसभरात २४ तास करी स्टॉल्स चालवणाऱ्या थाई वंशाचे काही लोकं देखील या शहरात अधिक आहेत. या लोकांसह मुस्लिमांची लोकसंख्या देखील मोठी असून ओपन रेस्टॉरंट्स देखील चालवले जाते. तर या शहरात चीनी लोकांची लोकसंख्या देखील जास्त आहे, तर ते आपल्या डिम सम डिशसाठी प्रसिद्ध आहेत. हे सर्व पदार्थ जगातील इतर भागात जेवणासाठी वापरले जातात, परंतु त्रांगमध्ये ते फक्त नाश्त्यासाठीच खाल्ले जातात.

- Advertisement -
- Advertisement -
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -