काय सांगता? ऐन कोरोनाच्या महामारीत माकडाच्या अंत्ययात्रेला 1500 लोकांची गर्दी

अनेक नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यातच मध्यप्रदेशातील एका गावात एका माकडाच्या अंत्ययात्रेला १,५०० लोकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदी लागू केली आहे.यादरम्यान. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

What do you say A crowd of 1,500 people at the funeral of the monkey in the Ain Corona epidemic
काय सांगता? ऐन कोरोनाच्या महामारीत माकडाच्या अंत्ययात्रेला 1500 लोकांची गर्दी

गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात अडकले होते. त्यामुळे या कोरोनातून सुटका करण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते.त्यातच आता पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. दिवसाला मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तरीही अनेक नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करताना अनेकदा पाहायला मिळत आहेत. त्यातच मध्यप्रदेशातील एका गावात एका माकडाच्या अंत्ययात्रेला 1500 लोकांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदी लागू केली आहे. यादरम्यान, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मध्यप्रदेश राज्यातील राजगड जिल्ह्यामधील दलुपुरा गावात ही घटना घडली आहे. या गावात एक माकड मरण पावले. स्थानिक लोकांच्या धार्मिक श्रद्धेमुळे माकडाचे अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी विधी करून माकडाच्या शेवटच्या प्रवास सुरू करण्यात आला आणि स्मशानभूमीत त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऐन कोरोनाकाळात माकडाच्या अंत्यदर्शनाला 1500 लोक जमा झाले.या लोकांनी सामाजिक अंतर न पाळता आणि मास्क न लावता कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले.यात दोन जणांना गजाआड करण्यात आले आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, माकड हे गावातच राहत होते आणि अनेकदा लोकांमध्ये येत होते. त्यामुळे त्याची गावकऱ्यांना ओढ लागली होती. धार्मिक श्रद्धेव्यतिरिक्त देशभरात ज्या प्रकारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे.त्याप्रमाणे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

देशातील 24 तासात 1,68,063 नवे रुग्ण

भारतात कोरोना रुग्णसंख्येत सोमवारच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,063 नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र आजच्या रुग्णसंख्येमुळे थोडा दिलासा मिळाला आहे. कारण सोमवारच्या तुलनेत आज 6.5 टक्के कमी रुग्ण नोंदवण्यात आले. तर कोरोनामुळे गेल्या चोवीस तासात 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69,956 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. यात सोमवारी देशात 1.79 लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यामुळे भारतात आतापर्यंत कोरोनाचे 3,58,75,790 रुग्ण आढळले आहेत. तर देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 4,461 वर पोहोचली आहेत.


हेही वाचा – Mihir Das: दिग्गज अभिनेते मिहिर दास यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन