सोशल मीडियावर होतेय कोहलीच्या बॅगेची चर्चा; युजर्सने मीम्स करून उडवली थट्टा

जेसीबीच्या वीडिओनंतर आता सोशल मीडियावर होतेय एका बॅगेची चर्चा

सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ असो तो व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. आताच काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर जेसीबीच्या व्हायरल व्हिडिओने सर्व रेकॉर्ड तोडले. ‘जेसीबी की खुदाई’ या नावाने असणाऱ्या या व्हिडिओला एक मिलिअन लोकांनी आतापर्यंत बघितले. तुमचा विश्वास बसणार नाही पण यावेळी एका बॅगेचा सोशल मीडियावर चांगलाच बोल-बाला आहे. या बॅगेचे नाव सोशल मीडियावर ‘मॅच्युअर बॅग’ असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बॅगसोबत भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली देखील दिसत आहे.

मात्र, ‘मॅच्युअर बॅग’ ही नेमकी गोष्ट कोणती आहे?, ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. काही दिवसांपुर्वी सोशल मीडिय़ावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये एका तरूणाने या बॅगेबद्दल असे सांगितले होते की, इतरांपेक्षा वेगळे दिसाय़चे असेल आणि सगळ्याचे लक्ष तुम्हाला वेधून घ्यायचे असेल तर ‘मॅच्युअर बॅग’ नक्कीच मदत करेल.. यानंतर युजर्सनी ‘मॅच्युअर बॅगे’वर मीम्स तयार करून चांगलीच थट्टा उडवली.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यांवर मीम्सचा वर्षाव होत आहे. एका यूजर्सने लिहिले की, मी ही ‘मॅच्युअर बॅग’ खरेदी केली आणि कॉलेजमध्ये एण्ट्री करताच १० मिनिटाच्या आत ६ मुली येऊन माझ्य़ाशी बोलून गेले.