Video : माशांना खायला देत होता व्यक्ती, मात्र अचानक असे काही झाले जे पाहून चक्रवाल

a person was feeding the fish suddenly this happened
Video : माशांना खायला देत होता व्यक्ती, मात्र अचानक असे काही झाले जे पाहून चक्रवाल

मासे दिसायला खूपचं गोंडस असतात. त्यामुळे अनेक जण लहान रंगीबेरंगी मासे घरातील एक्वैरियमध्ये किंवा इतर ठिकाणी ठेवतात. पण जगात माशांच्या इतक्या प्रजाती आहेत ज्यात मोठ्या माशांच्या प्रजातीपासून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जगात असे अनेक मासे आहेत जे माणसाच्या आकारापेक्षाही कितीतरी पटीने मोठे आहेत. मात्र हे मासे धोकादायक देखील तितकेच आहेत. सोशल मीडियावर सध्या एका अशाच धोकादायक माश्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका मोठ्या माशाचा आहे ज्याला एक व्यक्ती खायला देताना दिसतोय. मात्र अचानक असे काही घडते कीस जे पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, एका मोठ्या तलावासारखे काहीतरी आहे ज्यात चारी बाजूंनी जाळी आहे. आणि जाळीच्या वरही अतिशय मजबूत जाळी लावण्यात आली आहे. या जाळीखालील तलावात अनेक मोठे मासे पोहताना दिसतायत. यावेळी एक माणूस जाळ्यातून माशांना खायला घालण्याचा प्रयत्न करतोय. हे खाणं म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एक लहान मासे आहे. वास्तविक, असे काही मोठे मासे आहेत ज्यांचे खाद्य लहान मासे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sam Cook (@samcook.photos)

मात्र एक मोठ्या माश्याला खायला देताना असे काही घडते जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहायल की, तलावाच्या वरच्या जाळीवर एक माणूस पोटावर झोपून हाताने एक लहान मासा मोठ्या माश्यांना खायला देतोय. जाळीच्या मधून हात घालून खाली तलावात पोहणाऱ्या माशांना हे अन्न देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. यावेळी अचानक एक मोठा मासा त्या व्यक्तीचा हात त्याच्या तोंडातील लहान माशासह हिसकावून घेतो. हे पाहून तुम्ही अचानक घाबरून जाल. असे दिसते की, माशांनी त्या व्यक्तीचा हात देखील खाल्ले आहे.

मात्र, माशाने काही वेळाने माणसाचा हात सोडला आणि हातात ठेवलेला छोटा मासा खाऊन टाकला. माशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांनाही ते खूप आवडतोय. इंस्टाग्रामवर samcook.photos नावाच्या आयडीने ते शेअर करण्यात आले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.


Gyanvapi Masjid मधील शिवलिंग सापडल्याच्या दाव्यावर कंगना रनौतची प्रतिक्रिया, म्हणाली….