घरट्रेंडिंगकुत्र्याच्या कपाळाला शेपटी कधी पाहिलीये का? मग पाहाच

कुत्र्याच्या कपाळाला शेपटी कधी पाहिलीये का? मग पाहाच

Subscribe

अमेरिकेत प्राण्यांना जीवनदान देणाऱ्या संस्थेला डोक्यावर शेपूट असलेला कुत्रा सापडला.

लहानपणी आपण कथांमध्ये डोक्यावर शिंग असलेला घोडा म्हणजेच युनिकॉर्न बद्दल तर ऐकलच आहे, पण डोक्यावर शेपूट असलेल्या कुत्र्याबद्दल कधी ऐकलय का? तर अमेरिकेतील मिसुरी भागात एका प्राणी बचाव संस्थेनं डोक्यावर शेपूट असलेल्या एका कुत्र्याला वाचवलं आहे. ‘मॅक मिशन’ नावाच्या प्राणी वाचवण्याऱ्या संस्थेला मिसुरीच्या रस्त्यावर हा कुत्रा भटकताना आढळला. हा कुत्रा १० आठवड्यांचा असून त्याच्या दोन डोळ्यांच्यामध्ये एक छोटी शेपूट आहे. नरवाल नावाची एक व्हेल असते जिला डोक्यावर एक मोठा शिंग असतो तर या व्हेलच्या नावाकडून प्रेरणा घेत या कुत्र्याचं नाव देखील नरवल ठेवण्यात आलं.

तपासासाठी डॉक्टरांकडे गेलेला नरवल
तपासासाठी डॉक्टरांकडे गेलेला नरवल

नरवलच्या डोक्यावर असलेल्या शेपटीला पाहून सगळेच अचंबित होते तर त्या शेपटीबदद्ल आणि नरवलच्या आरोग्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्याचा एक्स-रे काढल्यानंतर हे समजण्यात आलं की त्याच्या डोक्यावरील शेपटाला हाड नाही आणि शेपटी काही हालचाल करू शकत नाही. मॅक मिशननं नरवलचा फोटो त्यांच्या फेसबुकवर टाकला आणि त्यानंतर नरवलचा फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल झाला. नरवलला भेटण्यासाठी खूप लोकं जमली आणि सगळेच त्याला भेटण्यासाठी फार उत्सुक आहेत असं संस्थेतील लोकांनी सांगितलं.

- Advertisement -
दिसण्यात जरी नरवल थोडा वेगळा असला तरी त्याची मस्ती एका सामान्य पिल्लासारखीच आहे.

 

मॅक मिशन ही संस्था विकलांग असलेल्या प्राण्यांचा बचाव करते आणि त्यानंतर वाचवलेल्या प्राण्यांना दत्तक देण्यासाठी देते. अंध, बहिरे, पाय नसलेले अशा अनेक प्रकारच्या कुत्र्यांना या संस्थेनं वाचवलं आहे. तरी नरवल सारखा पहिलाच कुत्रा त्यांना सापडला, असं संस्थेतील अधिकारी म्हणतात. यामुळे नरवल हा त्यांच्यासाठी फार स्पेशल आहे. संस्थेच्या लोकांच्या म्हणण्या प्रमाणे सध्यातरी त्यांनी नरवलच्या डोक्यावरची शेपूट काढण्याचा काही विचार केलेला नाही. जर भविष्यात जाऊन ती शेपूट त्याच्यासाठी त्रासदायक झाली तर ते काढतील. काही वेळ तरी नरवलला दत्तक देणार नाहीत, कारण त्याची शेपटीचा वाढ पुढे जाऊन कसा होतो, हे त्यांना पाहायचं आहे.

हेही वाचा: …आणि गो एअरचं प्रवासी विमान थेट शेतात घुसलं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -