Video- ‘हा’ प्राणी शिकवतोय, कोरोनाकाळात कसे हात धुवायचे!

Raccoon ने दाखवलेली हात धुण्याची पद्धत सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे.

कोरोनापासून स्वतः चा बचाव करायचाय, बघा 'या' प्राण्याचा व्हिडीओ

सध्या देशभरात कोरोना व्हायरस वेगानं पसरत असून कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा म्हणून घरात सुरक्षित रहा, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळायचा असेल तर स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. ही काळजी घेत असताना हात २० सेकंद स्वच्छ धुवायला हवेत. हात स्वच्छ केसे धुवावेत यासंदर्भात वारंवार प्रशासन, आरोग्य यंत्रणा विभाग, सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या स्तरातून नागरिकांना आवाहनही केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर २० सेकंद हात धुण्याचे चॅलेंज ही अनेकांनी एकमेकांना दिले होते. मात्र यावेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ एका प्राण्याचा आहे. त्याचे नाव रेकॉन Raccoon असून हात तर सगळेच धुवतात पण ते धुवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य पद्धतीने जर हात धुतले तर आपण निरोगी राहू, हेच हा प्राणी सांगत आहे. त्याने दाखवलेली हात धुण्याची पद्धत सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे.

Raccoon हा प्राणी कसे हात धुवायचे याचं जणू प्रात्यक्षिकच करून दाखवत आहे. या प्राण्याचा मजेशीर टीकटॉक व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट ऑफिसर (IFS) परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

असा आहे हा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून १७ हजारांपेक्षा जास्त युझर्सनी पाहिला आहे. या १५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हा प्राणी आपले हात नीट धुताना दिसत आहे. तो प्रथम पाण्याने भरलेल्या भांड्यात हात ठेवतो आणि मग साबणाच्या पाण्यात हात बुडवून चोळतो त्यानंतर तो पुन्हा पाण्याने आपले हात स्वच्छ धुताना दिसतो.


गो कोरोना, कोरोना गो!, म्हणणारे आठवले आता म्हणतात…