घरट्रेंडिंग'अब्बू को वीश नही करोगे?'; भारतीयांनी पाकिस्तानच्या उडवल्या चिंधड्या

‘अब्बू को वीश नही करोगे?’; भारतीयांनी पाकिस्तानच्या उडवल्या चिंधड्या

Subscribe

भारतीय चाहत्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानला 'अब्बू को वीश नही करोगे?' असा खोचक सवाल विचारला आहे.

देशभरात ७३ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. भारतीयांचा हा आनंद सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान ट्विटरवर सध्या #AbbuKoWishNahiKaroge हा ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्रेंडमध्ये भारतीयांनी पाकिस्तानच्या नागरिकांना ‘बापाला शुभेच्छा देणार नाही का?’ असा थेट सवाल केला आहे. या ट्रेंडसोबत भारतीयांनी अनेक मिम्सदेखील बनवले आहेत. या मिम्समार्फत भारतीय वापरकर्त्यांनी पाकिस्तानवर निशाना साधला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान, स्वातंत्र्य दिना निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे लाल किल्ल्यावरील समारंभ पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करतांना त्यांनी तिहेरी तलाक, कलम ३७०, देशातील गरीबी, देशाची अर्थव्यवस्था, दहशतवाद अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात येणार आहे. ते तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांवरील प्रभारी म्हणून काम पाहणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. लाल किल्ल्यावरून निघताना पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित लहान बच्चे कंपनीची भेट घेतली.


हेही वाचा – महापुरातील नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणू – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -