घरट्रेंडिंगमहाराष्ट्र पोलीस म्हणतात...'हे चालणार नाही'

महाराष्ट्र पोलीस म्हणतात…’हे चालणार नाही’

Subscribe

ताई, बाबा, दादा, बॉस, अशा एक ना एक फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करत असाल तर सावधान.

सध्याच्या ट्रेंडनुसार अनेक जण आपल्या गाडीची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावतात. यामध्ये ताई, बाबा, दादा, बॉस, अशा एक ना एक फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करण्यात येतो. बऱ्याचदा तो नंबर काय आहे ते कळत देखील नाही. पण, ते फॅन्सी नाव मात्र, चांगलच लक्षात राहत. परंतु, आता जर तुम्ही अशा, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करत असाल तर तुम्हाला चांगलेच महागात पडणार आहे. याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी खास स्टाईलमध्ये ट्विट करत कारवाईचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले महाराष्ट्र पोलीस?

‘बॉस’, ‘ताई’, ‘दादा’, ‘बाबा’ सर्वांनी लक्षात ठेवा. वाहनावर सजावटी ‘नंबर प्लेट’ लावल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. बऱ्याचदा नावांचे नंबर जुळवलेली वाहने वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, अशा नंबर प्लेटचा वापर केल्यास त्या वाहनधारकांना आता महागात पडणार आहे. त्याबाबत पोलिसांनी धोक्याची सूचना दिली आहे. त्यामुळे आता अशा नंबर प्लेटचा वापर करणाऱ्या वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी खास मोहिम उघडली आहे. तर बऱ्याच जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. तर ज्या वाहनचालकांवर याआधी कारवाई करण्यात येऊन देखील त्यांनी नंबर प्लेट बदलेल्या नाहीत, अशा लोकांची वाहनही जप्त करण्यात आली आहेत.

अशा नंबर प्लेट का वापरतात

बऱ्याचदा वाहनचालकांची भाईगिरी सुरु असते. तसेच गुन्हेगारी आणि कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये, म्हणून फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करण्यात येतो. स्वत:ची आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी अशा गाड्यांच्या नंबर प्लेटचा वापर करण्यात येतो.

- Advertisement -

हेही वाचा –  रेखा जरे हत्या प्रकरण- बाळ बोठे तीन महिने कुठे होते?


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -