Jawed Habib Video : जावेद हबीबने डोक्यावर थुंकून कापले महिलेचे केस! नंतर दिले असे स्पष्टीकरण

जावेद हबीब यांनी थुंकून केस कापल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, जावेद हबीब यांनी केस कापण्यासाठी पाण्याचा नाही तर थुंकीचा वापर केला. तो इथ वरचं थांबले नाही तर यावर तो म्हणतो की, या थुंकीत जाण आहे.

After Creating Controversy For Spitting On A Woman's Head, Hairdresser Jawed Habib Now Apologises To Her
जावेद हबीबने केसावर थुंकून कापले महिलेचे केस! नंतर दिले उत्तर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका महिलेच्या केसावर आधी थुंकतो त्यानंतर तिचे केस कापताना दिसतोय. मात्र या व्हिडिओवरून त्याला बरेच ट्रोल केले जातेय. ज्यानंतर जावेद हबीबने आता जाहीर माफी मागितली आहे. इन्स्टाग्रामवर जावेद हबीबने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, मी मनापासून माफी मागतो. मात्र या व्हिडिओमध्ये जावेदने माफी तर मागितली मात्र थुंकण्याच्या घटनेवर एक शब्दही बोलला नाही.

यात जावेद हबीब म्हणाला की, माझ्या काही शब्दांमुळे दुखावले गेल्याने मी माफी मागतो. पुढे जावेद म्हणतोय की, माझ्या सेमिनारमधील काही शब्दांमुळे काही लोक दुखावले गेले आहेत, मी एकच सांगू इच्छितो की, आमच्याकडे जे सेमिनार आहेत ते प्रोफेशनल सेमिनार असतात. याचा अर्थ जे आमच्या प्रोफेशनमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी अनेक वेळ चालणारे सेमिनार असतात, त्यामुळे अशा सेमिनारमध्ये विनोदी करावे लागतात. पण तुम्ही दुखावले गेले असाल तर माफ करा, सॉरी.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Jawed Habib (@jh_hairexpert)

काय प्रकरण आहे

जावेद हबीब यानो थुंकून केस कापल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, जावेद हबीब याने केस कापण्यासाठी पाण्याचा नाही तर थुंकीचा वापर केला. ते इतवरचं थांबले नाही तर यावर तो म्हणाला की, या थुंकीत जाण आहे.

व्हिडिओमध्ये जावेद हबीब याने आधी एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले. केस कापतचं तो म्हणतो की, ‘माझे केस घाणेरडे आहेत, का? कारण मी शाम्पू लावला नाही, नीट ऐका, आणि जर पाण्याची कमतरता असेलच ना तर…. या थुंकीत जीव आहे. असं म्हणत तो त्या महिलेच्या केसांवर चक्क थुंकतात.

यादरम्यान उपस्थित लोकांनी जावेद हबीब याच्या अशा वागवण्यावर जोरदार टाळ्या वाजवल्या, मात्र ज्या महिलेचे केस कापले जात होते ती व्हिडिओमध्ये मात्र फारचं अस्वस्थ झाल्याचे दिसतेय. या घटनेवर संबंधित महिलेने सांगितले, माझे नाव पूजा गुप्ता, माझे वंशिका ब्युटी पार्लर नावाचे पार्लर आहे. मी बरौत येथील रहिवासी आहे. काल मी जावेद हबीब सरांच्या सेमिनारला गेलो होते.’ महिलेने पुढे सांगितले की, (जावेद हबीब) मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले. त्याने माझ्याशी गैरवर्तन करत पाणी नसेल तर थुंकूनही केस कापता येतात, असे म्हणत माझ्या केसांवर थुंकले, यानंतर मी केस कापण्यास नकार दिला आणि निघून गेले. मात्र या घटनेनंतर मी रस्त्यावरील न्हाव्याकडून केस कापून घेईन पण जावेद हबीबचेकडून मुळीत घेणार नाही. असं ती म्हणाली.

जावेद हबीबविरोधात गुन्हा दाखल

थुंकून केस कापल्याप्रकरणी प्रसिद्ध ब्युटीशियन आणि हेअर डिझायनर जावेद हबीब याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात पीडित महिला पूजा गुप्ताने जावेद हबीबविरुद्ध कलम ३५५, ५०४ आयपीसी, ३ महामारी कायदा आणि ५६ आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी पुतळा जाळला

कोरोना संक्रमण काळात हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब याने महिलेच्या केसात थुंकल्याबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जावेद हबीब याच्या विरोधात क्रांती सेना आणि हिंदू जागरण मंचने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, तर हिंदू जागरण मंचाने जावेद हबीब यांचा पुतळा जाळून निषेध केला.


जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; 3 दहशतवाद्यांचा खात्मा