महिलेच्या गर्भाशयातून काढला फुटबॉलएवढा ट्यूमर

दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये या महिलेवर यशस्वी उपचार

दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये काढला १७ किलोचा ट्यूमर

दिल्लीतील एम्स या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना एका महिलेच्या गर्भाशयातून फूटबॉलच्या आकाराएवढा ट्यूमर काढण्यात यश आलं आहे. हा ट्यूमर १७.९ किलो वजनाचा असून सात नवजात मुलांच्या वजनाइतके या ट्यूमरचं वजन होतं.

“ महिलेच्या गर्भाशयात हा एक मोठ्या आकाराचा ट्यूमर होता. पण, कोणताही आकार शस्त्रक्रियेला आव्हान करु शकत नाही. शिवाय, जेव्हा शस्त्रक्रिया केली त्याचा परिणाम इतर कोणत्याही अवयवांवर झालेला नाही. त्यामुळे हा ट्यूमर काढणं अगदी सोपं होतं. या महिलेला योग्य वेळी योग्य सल्ला न मिळाल्यामुळे तिच्या गर्भाशयात एवढा मोठा ट्यूमर झाला होता” असं एम्स या हॉस्पिटलचे प्राध्यापक आणि ऑन्कोलॉजिस्ट डॉ. एमडी रे यांनी सांगितलं.

त्या महिलेला तिच्या गर्भाशयात एक ट्यूमर आहे कळलेच नव्हते आणि त्यातून तिचे वजन वाढत होते.
तिच्या मुलाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, ” अल्ट्रासाऊंड करण्याच्या एक महिन्याआधी आईला ट्यूमर झाला होता. माझ्या एका नातेवाईकाने तिला हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथल्या डॉक्टरांनी तिचे रिपोर्ट पाहिले तेव्हा त्याने त्वरित तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्यानंतर, आम्ही तिला एम्समध्ये नेलं. ”

महिलेच्या गर्भाशयातून काढला १७ किलो ट्यूमर –

हे कुटुंब हरियाणाच्या बहादूरगडजवळील खेड्यात राहत आहे आणि शेतात काम करुन आपला उदरनिर्वाह करत आहे.

दिल्लीतील महिलांमध्ये ३.५ टक्के गर्भाशयाचा कर्करोग आढळतो.
“ ही महिला सतत शेतात काम करायची. जवळपास एका वर्षांपासून ती स्थूलपणाची तक्रार होती. योग्य प्रकारे अन्न पचवता येत नाही असं तिला वाटत होतं.” असंही मुलाने स्पष्ट केलं.

डॉ. रे म्हणाले की, चिंतेचे कारण म्हणजे, ट्यूमर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतरच ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.

“ हॉस्पिटलमध्ये येणारे बहुतेक रूग्ण ९० टक्के रोगाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर येतात. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी या रुग्णांचे बरेच प्रयत्न झालेले असतात. जसे की, वैद्य, हाकिम आणि होमिओपॅथीचे उपचार ही मंडळी घेतात. या प्रकरणात कर्करोगाचा हा ट्यूमर होता आणि वेगाने वाढत होता. रुग्ण लठ्ठ असला तरी, तिचे वजन बहुतेक तीन ते सहा महिन्यांपर्यंत वाढले असावे. “