घरट्रेंडिंगविमानात 'एअरहोस्टेस आई' रिटायर होताना

विमानात ‘एअरहोस्टेस आई’ रिटायर होताना

Subscribe

पायलट, एअर होस्टेस होण्याची स्वप्ने अनेकांनी लहानपणी पाहिली असतील. पायलट आणि एअर होस्टेसना छान विमानातून जग फिरता येते. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणारे अधिक असतात. पण एकावेळी हजारो प्रवाशांची काळजी घेणे कठीण काम आहे

एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या माय- लेकींच्या अनेक जोड्या तुम्हाला माहित असतील. पण मुलगी पायलट आणि आई एअरहोस्टेस असे फार कमीच ऐकले असेल. आज एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये असं काही घडलं की, एअर इंडिया कर्मचाऱ्यांसह प्रवासीही भावनिक झाले. बंगळुरुवरुन मुंबईला येणारी फ्लाईटला उशीर झाला होता. कॅप्टन या संदर्भातली माहिती प्रवाशांना देत होता. त्यावेळी त्याने आणखी एक घोषणा केली ती म्हणजे ‘ विमानातील सगळ्यात वरिष्ठ एअर होस्टेस पूजा चिंचणकर मुंबईत फ्लाईट उतरल्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. आज त्यांच्या कार्यकाळातील ही शेवटचा विमान प्रवास असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!’ ही घोषणा ऐकताच अनेकांनी त्यांना हसतमुखाने सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे याच विमानाची को- पायलट पूजा यांची मुलगी अश्रितादेखील होती. त्यामुळे आता यापुढील वारसा ती चालवणार आहे.

- Advertisement -

३८ वर्षे केली सेवा

पायलट, एअर होस्टेस होण्याची स्वप्ने अनेकांनी लहानपणी पाहिली असतील. पायलट आणि एअर होस्टेसना छान विमानातून जग फिरता येते. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणारे अधिक असतात. पण एकावेळी हजारो प्रवाशांची काळजी घेणे कठीण काम आहे. न थकता न थांबता अविरत चालणाऱ्या विमानसेवेत जगभरातील माणसे प्रवास करतात. त्याच्या सेवेसाठी विमानातील कर्मचारी काम करतात. यातल्याच एक पूजा चिंचणकर, १९८० साली त्या एअर इंडियात एअर होस्टेस पदावर रुजू झाल्या. त्या दिवसापासून ते आज पर्यंत त्यांनी प्रवाशांची सेवा केली. ३८ वर्षे त्यांनी ही सेवा केली असून त्या सिनीअर एअरहोस्टेस पदापर्यंत पोहोचल्या. एअर इंडियाची A-319 ही फ्लाईट बंगळुकरुहून मुंबईला निघाली आणि विमानातच त्यांच्या सेवानिवृत्तीची घोषणा झाली. त्यानंतर त्यांनी विमानात फेरी मारत प्रवाशांचे आभार मानले.

मुलीला पायलेट करायचा निर्धार

पूजा चिंचणकर ज्यावेळी एअर होस्टेस म्हणून रुजू झाल्या तेव्हा २ महिला पायलट होत्या. त्यांना बघून अभिमान वाटायचा.माझ्या मुलीला मी पायलट करणार असे त्यांनी ठरवून टाकले होते. २०१६ साली अश्रिता पायलट म्हणून एअर इंडियात रुजू झाली. अनेकदा या माय-लेकी एकाच फ्लाईटमध्ये असायच्या. अनेक प्रवास त्यांनी एकत्र केले आहेत. आज आईच्या रिटायरमेंटची घोषणा पायलट परेश नेरुरकर यांनी केल्यावर को पायलट अश्रिताही कॉक-पिट बाहेर आली आणि तिने आईला शुभेच्छा दिल्या. एअर इंडियाने ट्विट करत त्यांना या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -