सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला डॉल्फिनच भन्नाट व्हिडीओ तुम्हीसुद्धा पाहिलात का?

समुद्राच्या लाटांमध्ये डॉल्फिनचा एक गट खेळकर पद्धतीने मजा करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. डॉल्फिनचा समुद्रात विहार करतानाचे हे दृश्य पाहताना तुम्हालाही असच वाटेल की, तुम्ही डॉल्फिनचा अॅनिमेटेड चित्रपट पाहत आहात.

सध्या सोशल मीडियावर डॉल्फिनचा एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. डॉल्फिन् हे खूप हुशार आणि बुद्धिमान मानले जातात. असेही म्हटले जाते की मानवानंतर डॉल्फिनची स्मरणशक्ती सर्वात जास्त तल्लख असते. डॉल्फिन्स अनेकदा आपल्या खोडकर शैलीने सर्वांची मने जिंकते. डॉल्फिन माणसांमध्ये खूप लवकर मिळसून जातात. डॉल्फिन्स अनेदा डान्स करतानाही दिसतात. असाच डॉल्फिनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.

हे ही वाचा –  मुलाच्या सुरक्षेसाठी आईचा भन्नाट जुगाड; व्हिडीओ शेअर करत हर्ष गोएंकांनीही केलं कौतुक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, डोल्फिनचा एक गट समुद्राच्या लाटांमध्ये मुक्त विहार करताना दिसत आहेत, हे दृश्य डोळ्यांना सुखावणारे आहे. समुद्राच्या लाटांमध्ये डॉल्फिनचा एक गट खेळकर पद्धतीने मजा करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. डॉल्फिनचा समुद्रात विहार करतानाचे हे दृश्य पाहताना तुम्हालाही असच वाटेल की, तुम्ही डॉल्फिनचा अॅनिमेटेड चित्रपट पाहत आहात.

डॉल्फिनचा हा मजेशीर व्हिडीओ ट्विटरवर ‘Buitengebieden’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि शेअर करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 51 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ 6 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर मजेशीर प्रतिक्रियासुद्धा देत आहेत.

हे ही वाचा – यात्रेच्या आठवणी : “बायस्कोप’च्या पेटार्‍यातील पिक्चर”