घरट्रेंडिंगएक फोटो अन् अंबरनाथचा Cylinder Man झाला रातोरात स्टार, व्हायरल फोटोची सोशल...

एक फोटो अन् अंबरनाथचा Cylinder Man झाला रातोरात स्टार, व्हायरल फोटोची सोशल मीडियावर तूफान चर्चा

Subscribe

एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच

सध्याच्या काळात सोशल मीडियावर कोण कधी कसं फेमस होईल सांगता येत नाही. सोशल मीडियाची पॉवर वेळोवेळी दिसून आलीय. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अंबरनाथच्या सागरचं नशीबच फळफळलं. गॅस वितरण करणारा  सागर जाधव रातोरात फेमस झाला. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभ्या असलेल्या एका रांगड्या, मिश्या असलेल्या आणि पिळदार शरीर यष्टी असलेल्या एका तरुणाचा फोटो व्हायरल झाला होता आणि या फोटोने गॅसवाल्या सागरला सिलेंडर मॅन अशी ओळख मिळाली. (Ambernath Cylinder Man Sagar jadhav photo viral on social media) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सागरच्या फोटोच्या लाखो लाईक्स आणि कमेंट्स आणि मिम व्हायरल झाले आहेत. अंबरनाथमध्ये देखील सागरचे जोरदार कौतुक होत आहे.

 

- Advertisement -

गेल्या १२ वर्षांपासून सागर अंबरनाथमध्ये गॅस सिलेंडरची डिलिव्हरी देण्याचे काम करत आहे. एक दिवस तो गॅस टेम्पोला खोटून उभा होता. तेव्हा एका नेटकऱ्याने त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले आणि काही वेळातच सागचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तुकाराम मुंडे, अभिनेता कुशल बद्रिके यासारख्या अनेकांनी सागरच्या फोटोला पसंती देत त्याचे कौतुक केले. जिथे तो सिलेंडर द्यायला जायचा तिथे आता लोक त्याला एक सेलिब्रेटी असल्यासारखी वागणूक देतात. त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी देखील त्याचे कौतुक केले. मी पुढे जाऊन नाव कमवावे असे त्याला सर्वजण सांगत असल्याचे सागरने म्हटले आहे. सोशल मीडियाच्या एका फोटोमुळे सागरचे नशीब बदलेल असे त्याला वाटलेही नव्हते. एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच आहेत.

- Advertisement -

सागर हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील आहे. त्याचे १२ पर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यानंतर वडिल वारल्यानंतर तो अंबरनाथमध्ये शिफ्ट झाला. अंबरनाथमध्ये कामाच्या शोधात असताना सागरला भारत गॅसमध्ये नोकरी लागली. गेल्या १२ वर्षांपासून सागर गॅस सिलेंडरची डिलिव्हरी देण्याचे काम करत आहे. सागर आधी अतिशय बारिक होता. ४५ किलोच्या माणसाने ३० किलोचा सिलेंडर कसा उचलायचा? असा प्रश्न सागरला पडला आणि गेल्या ३ वर्षांपासून सागरने बॉडी बनवायला सुरूवात केली. त्याच्या जबरदस्त हेल्दी बॉडीमुळे तो सागर आज ४-४ मजले चढून लोकांपर्यंत सिलेंडर पोहचवून आपल घर चालवतो आहे. सागरच्या घरी त्याचे काका काकू, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे.


हेही वाचा – अबब! घरात सापडली ५०० वर्ष जुनी विहिर, बाहेर आल्या धक्कादायक वस्तू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -