घरट्रेंडिंगvideo: कार पार्किंगचा देशी जुगाड पाहून आनंद महिंद्रा झाले फिदा!

video: कार पार्किंगचा देशी जुगाड पाहून आनंद महिंद्रा झाले फिदा!

Subscribe

सोशल मीडियावर होतंय या भन्नाट कल्पनेचे कौतुक

आजकाल अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. देशी जुगाड करून कार पार्किंगची भन्नाट कल्पना या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे देखील या इंडियन जुगाड वर फिदा झाले आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर सीसीटीव्ही इडियट्स नावाच्या एका युजर्सने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपली कार अनोख्या स्टाईलने पार्क करतो हे दाखवण्यात आले आहे.

- Advertisement -

आनंद महिंद्रा यांच्याकडून कौतुक

यावर आनंद महिंद्रा यांनी स्वतः ट्विट करत त्या व्यक्तीच्या भन्नाट कल्पना शक्तीचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी असे लिहिले आहे की, काही दिवसांपूर्वी पंजाबमधील असाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला. पण हा व्हिडीओ आणि यातील कल्पना त्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. मला यामध्ये पार्किंगची केलेली व्यवस्था आणि त्यासाठीची कल्पना मला खूपच आवडली. मला आशा आहे की, ज्याने हे डिझाइन केले आहे तो फॅक्टरी लेआउट तयार करण्यासाठी आम्हाला नक्कीच आऊट ऑफ द-बॉक्स कल्पना देऊ शकेल.

सोशल मीडिआवर होतंय कौतुक

1.

2.

3.

4.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -