रस्त्यांवरील खड्डे भरण्याची अनोखी पद्धत, आनंद महिंद्रांनी व्हिडीओ केला शेअर

Anand Mahindra Essential For India Video Takes Social Media By Storm

भारताचे उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असतात. अनेकदा विविध पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून ते युजर्सना मजेशीर तर कधी प्रेरणादायी आयडिया देत असतात. अशात आनंद महिंद्रांनी एक भन्नाट आयडेबाज व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यातून त्यांनी भारतातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एक आयडिया दिली आहे. आनंद महिंद्रांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक असा पॅच टाईप कार्पेट दाखवण्यात आला आहे जो रस्त्यांवरील खड्डे बुडवण्यासाठी आणि खड्ड्यांवर वॉटरप्रूफ सील म्हणून काम करतो.

या व्हिडीओमध्ये यूएस आधारित कंपनी अमेरिकन रोड पॅचद्वारे निर्मित केलेल्या उत्पादनाची ही जाहिरात आहे. या पॅचमुळे काही वेळातच रस्त्यावरील खड्डा पूर्णपणे भरला जातो. ज्यामुळे अनेकदा काही काळ रस्ता दुर्गम बनवतो. ही क्लिप शेअर करताना महिंद्रा म्हणाले की, मी म्हणेन की ही एक नवीन पद्धत आहे जी भारतासाठी आवश्यक आहे. काही बांधकाम/बांधकाम साहित्य तयार करणाऱ्या कंपनीला एकतर याचे अनुकरण करावे लागेल किंवा या फर्मला सहकार्य करावे लागेल. तसेच ही पद्धत बाहेरपर्यंत पोहचवावी लागेल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही क्लिप 1 लाखाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. एका युजर्सने फायर इमोजी शेअर करत म्हटले की, “हे आश्चर्यकारक आहे.” तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, “सर – मोठमोठे खड्डे तयार होण्याआधी आणि रस्ते खड्डे भरले जाण्याआधीच इशारा दिल्यास ते उपयुक्त ठरेल. पावसाळ्यासाठी विशेषत: मुंबईसाठी हे उपयुक्त आहेय महिंद्रांच्या मताशी अनेकजण सहमत आहेत, तर काहींना हे शक्य होईल असे वाटले नाही.

एका युजरने स्पष्ट केले की, भारतीय रस्त्यांच्या स्थितीवर कोणताही व्यावहारिक उपाय नाही. तसेच अनेक प्रकारचे खड्डे आहेत. जर खड्डा कार्पेट लेयर (वेअर कोर्स) पेक्षा खोल असेल तर तो बेस आणि सब-बेस कोर्सने भरला पाहिजे. हे तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. आमच्याकडे चांगले सिव्हिल इंजिनीअरही आहेत. त्यामुळे आनंद महिंद्रांच्या या नव्या पद्धतीबाबत तुम्हाला काय वाटते ते सांगा.


येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार : अविनाश भोसले, संजय छाब्रियाच्या ४१५ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच