जगातील सर्वात मोठे गाल करण्याच्या नादात मॉडलने गमावला सुंदर चेहरा

anastasia pokreshchuk model from kiev ukraine claims to have the biggest cheeks in the world
जगातील सर्वात मोठे गाल करण्याच्या नादात मॉडलने गमावला सुंदर चेहरा

सुंदर दिसणे हे प्रत्येकाचेचं स्वप्न असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. सध्याच्या सोशल मिडियाच्या जगात आपण स्क्रिनवर आपण कसे अधिक सुंदर दिसू यासाठी प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक जण चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करुन घेतात. हा कमी वेळात पटकन इफेक्ट देणारा शस्त्रक्रियेचा महागडा ट्रेंड हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत पाहायला मिळाला. परंतु ही शस्त्रक्रियेचा याचा काय परिणाम होऊ शकतो हे एका मॉडेलच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजू शकते. युक्रेनच्या एका मॉडेलने अधिक सुंदर दिसण्यासाठी गाल आणि ओठांवर शस्त्रक्रिया करुन घेतली. तिला सुंदर दिसण्यासाठी ओठ आणि गाल गोल करायचे होते. परंतु तिची ही शस्त्रक्रिया झाली आणि तिला ओळखणेही कठीण झाले आहे. तिच्या शस्त्रक्रियेनंतरच्या चेहऱ्याची अनेकांनी टेर खेचली. कारण तिचा हा चेहरा एका कार्टुनप्रमाणे दिसत होता. युक्रेनची असलेली अनास्तासिया पोक्रेशचुक ही मॉडेल ३२ वर्षांची आहे. गेल्या सहा वर्षात तिने अनेक शस्त्रक्रिया करुवून घेतल्या.

परंतु आत्ताचा लुक मिळवण्यासाठी तिला सहा वर्षाचा कालावधी लागला. अनास्तासियाने तिचा चेहरा बदलण्यासाठी तब्बल २ हजार १०० डॉलर म्हणजे जवळपास दीड लाख रुपये खर्च केले आहेत. या लुकवर अनास्तासियावे दावा केला की, तिचे गाल जगातील सगळ्यात मोठे गाल आहेत. अनास्तासियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले. त्यात तिने तिचा सहा वर्षपूर्वीचा शस्त्रक्रियेच्या आधीचा फोटोही शेअर केला. तो पाहून चाहतेही अवाक झाले आहेत. कारण त्या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झालाय. यापूर्वी शरीरात केलेल्या बदलांबद्दलही तिने सोशल मीडियावर सांगितलं होतं. तिचे फोटो पाहून चाहते अचंबित झाले आहेत. तसेच, काही युजर तिने सुंदर चेहरा कुरूप केला, असं म्हणत तिची थट्टा उडवत आहेत.


हेही वाचा- नवरा माझा फोटो डीपीत ठेवत नाही, बायकोची पोलिसांत अजब तक्रार