Angarki Sankashti Chaturthi 2021: काय आहे अंगारकी चतुर्थीची कथा? जाणून घ्या आजच्या चंद्रोदयाची वेळ

ज्या दिवशी भगवान गणेश अंकारकला प्रसन्न झाले तो दिवस संकष्टी चतुर्थीचा असून त्या दिवशी मंगळवार होता. त्यानंतर मंगळवारी येणारी प्रत्येक संकष्टी ही अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाऊ लागली.

Angarki Sankashti Chaturthi 2021 story and moonrise time
Angarki Sankashti Chaturthi 2021: काय आहे अंगारकी चतुर्थीची कथा? जाणून घ्या आजच्या चंद्रोदयाची वेळ

सर्व गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा असणारा दिवस म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. आज मुंबईसह राज्यातील अनेक गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर असो पुण्यातील दगडू शेठ हलवाईचे मंदिर असो भविकांनी आवर्जुन मनोभावे बाप्पाच्या मंदिरात हजेरी लावली आहे. दर महिन्याला संकष्टी येते आणि संकष्टी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. आजच्या दिवशी गणेशाची पूजा केल्यास उपासना केल्यास बाप्पाच्या कृपेने त्यांना आशिर्वाद मिळतात आणि आपल्या मनीच्या इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी करण्यामागे देखील एक रंजक कथा आहे. आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ती कथा जाणून घेऊ.

 

अंगारकी चतुर्थीची कथा

पुराण कथांनुसार, कृतयुगात अवंती नगरीतील वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे गणपतीने भक्त होते. या ऋषींकडून पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामाचा एक भौमपुत्र जन्माला आला. जो जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यातील रक्तवर्णीय वर्णाचा होता. हा अंकारक सात वर्षांचा झाल्यानंतर त्याला भरद्वाज ऋषींकडे पाठवण्यात आले. ऋषींच्या सानिध्यात त्याने वेद,गणेशमंत्राची उपासाना केली. त्यानंतर अंकारक अरण्यात गेला आणि तिथे त्याने एक सहस्त्र वर्ष तपाला बसून भगवान श्री गणेशाला प्रसन्न केले. ज्या दिवशी भगवान गणेश अंकारकला प्रसन्न झाले तो दिवस संकष्टी चतुर्थीचा असून त्या दिवशी मंगळवार होता. त्यानंतर मंगळवारी येणारी प्रत्येक संकष्टी ही अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाऊ लागली.

अंकारकाने गणेशाला प्रसन्न केल्यानंतर त्यांच्याकडे स्वर्गात राहून अमृत प्राश करायचे आणि त्रैलोक्यात विख्यात होण्याचे वरदान मागितले. गणेशाने हे वरदान दिले आहे. अंकारकच्या सहस्त्र वर्षांच्या तपामुळे मिळालेले पुण्य हे युगानुयुगे वाटले जाऊन लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील असा वर त्याला दिला. त्याचप्रमाणे गणेशाने अंकारकला तू त्रैलोक्याततून सुविख्यात होशील आणि भूमिपूत्र म्हणून भौम,आकारका सारखा लाल आहेस म्हणून तुझ्यात अंकाकर आणि शुभ करण्याची शक्ती असेल. तुझे नाव मंगळ या ग्रहाच्या नावाने ब्रम्हांडात असेल असे म्हटले. म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

चंद्रोदयाची वेळ

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राची पूज करुन उपवास सोडतात.

आजची चंद्रोदयाची वेळ

२३ नाव्हेंबर २०२१ – रात्री ८:२७ वाजता


हेही वाचा – Taj Mahal : पत्नीला गिफ्ट केला हुबेहुब ताजमहाल, पतीची तीन वर्षांची तपश्चर्या