घरट्रेंडिंगHappy April Fools Day : 'एप्रिल फूल डे' साजरा करण्यामागे नेमकं कारण...

Happy April Fools Day : ‘एप्रिल फूल डे’ साजरा करण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या रंजक गोष्ट

Subscribe

April Fools Day 2022 : दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात एप्रिल फूल दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस अमर्यादित हास्य, विनोद आणि आनंदासाठी समर्पित आहे. सहसा लोक एकमेकांचे पाय ओढण्याचे आणि खोड्या करण्याचे खेळत असतात. पण या दिवशी लोक त्यांच्या प्रियजनांना किंवा मित्रांना आश्चर्यचकित करण्यासाठी आनंदी कल्पना घेऊन येतात आणि नंतर शेवटी उघड करतात की, हे सर्व खोटे होते. मुलं, वयोवृद्ध प्रत्येकजण एकमेकांना मुर्ख बनवण्याच्या खेळात उत्साहाने भाग घेतात. शतकानुशतके विविध संस्कृतींद्वारे एप्रिल फूल्स डे साजरा केला जात आहे. या दिवसाबद्दल तुम्ही अनेक किस्से ऐकली असतील, मात्र एप्रिल फूल डे साजर करण्यास कुठे, केव्हा आणि कशी सुरुवात झाली याची माहिती खूप कमी लोकांना असेल. असे म्हणतात की, हा दिवस पहिल्यांदा युरोपमध्ये साजरा केला गेला.

‘एप्रिल फूल डे’ चा इतिहास आणि मूळ

‘एप्रिल फूल डे’ हा दिवस का साजरा करतो किंवा त्याची सुरुवात कधी झाली? याबाबत एक रहस्य आहे. इतिहासकारांचा असा अंदाज आहे की, हा दिवस 1381 सालापासून हा दिवस साजरा करणयास सुरूवात झाल्याचे सांगितले जाते. इंग्लंडचा राजा रिचर्ड II आणि बोहेमियाची राणी अॅनी यांनी लग्नाची घोषणा केली होती. त्यांनी त्यांच्या एंगेजमेंटची तारीख 32 मार्च ठेवली होती. यावेळी लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र जेव्हा लोकांना सेलिब्रेशन करण्यापासून ब्रेक मिळाला तेव्हा त्यांना कळले की, कॅलेंडरमध्ये 32 मार्च अशी कोणतीही तारीख नाही, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपल्याला भारीच मूर्ख बनले आहेत. तेव्हापासून एप्रिल फूल डे साजरा करण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

या दिवसाचा असाही एक आहे की, 1582 मध्ये चार्ल्स पोपने फ्रान्समधील जुने कॅलेंडर बदलले होते. त्याच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर सुरू करण्यात आले. असे असूनही, बरेच लोक जुन्या कॅलेंडरचे अनुसरण करत राहिले. त्यानंतर अनेकांनी या दिवशाची थट्टा सुरु केली. तेव्हापासून हा दिवस ‘एप्रिल फूल’ डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

भारतात कधी साजरा करायला सुरुवात झाली?

काही अहवालांनुसार, ब्रिटिशांनी हा दिवस भारतात 19 व्या शतकात साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत तो साजरा करण्याची क्रेझ वाढली आहे. सोशल मीडियावरही त्याच्याशी संबंधित मीम्स जोक्स प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र, विनोद करताना या गोष्टी लक्षात ठेवा, तुमच्या कोणत्याही शब्दाने लोक दुखावू नयेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -