घरट्रेंडिंगअश्मयुगीन मानवाला होती आधुनिक युगाची दूरदृष्टी

अश्मयुगीन मानवाला होती आधुनिक युगाची दूरदृष्टी

Subscribe

अश्मयुगीन मानवाच्या अनेक खुणा जगभरात सापडल्या आहेत. आताच्या मानवाच्या तुलनेत त्याची रचना अतिशय वेगळी होती. सापडलेल्या सांगाड्यांवरुन, दातांवरुन या युगातील मानवाची ठेवण विशिष्ट असल्याचे आपण पाहिले आहे. पण हातांची रचना मात्र आताच्या युगाचील मानवाप्रमाणेच असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

मानवी उत्क्रांतीचा इतिहास सगळ्यांनीच अभ्यासला आहे. त्यातील अश्मयुगीन काळ लोटून ५० हजार वर्षे झाली आहेत. या काळात मानवी गरजांप्रमाणे अश्मयुगीन माणसाने शोध लावले. आगीचा, चाकचा शोध या काळात लागला. शिकार करण्यासाठी दगडांपासून भाला, तासण्या, सुरी, छन्नी अशी काही हत्यारे प्रामुख्याने सापडली. पण या अश्मयुगीन मानवाला आधुनिक युगाची दूरदृष्टी असल्याचे अनेकदा म्हटले जाते. पण आता इंग्लंडमधील केंट विद्यापीठाने यावर अधिक अभ्यास करत अश्मयुगीन मानवाचा हात आधुनिक काळातील मानवाप्रमाणेच असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

अश्मयुगीन हाताची ठेवण आधुनिक

अश्मयुगीन हत्यारांच्या अभ्यासावरुन त्या युगातील हत्यारांची बनावट ही अगदी आताच्या काळातील हत्यारांप्रमाणे आहे. अश्मयुगीन मानव म्हणजेच होमो हॅबिलसची हत्यारावरील पकड आणि आधुनिक काळातील मानवी पकड यामध्ये साधर्म्य आहे. असे साधर्म्य असल्याशिवाय अशा प्रकारची हत्यारं तयार होणे शक्य नाही, असे देखील या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

हातांची रचना सारखी

अश्मयुगीन मानवाच्या अनेक खुणा जगभरात सापडल्या आहेत. आताच्या मानवाच्या तुलनेत त्याची रचना अतिशय वेगळी होती. सापडलेल्या सांगाड्यांवरुन, दातांवरुन या युगातील मानवाची ठेवण विशिष्ट असल्याचे आपण पाहिले आहे. पण हातांची रचना मात्र आताच्या युगाचील मानवाप्रमाणेच असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. हत्यांराना पकडण्यासाठी लागणारी हाताची रचना ही आधी वर्णन केलेल्या अश्मयुगीन माणसांपेक्षा वेगळी होती हे मात्र नक्की!

man evolution
मानवी उत्कांतीचे टप्पे (सौजन्य- वाईल्ड फॅक्ट)

प्लॅटफॉर्म प्रिपरेशन

अश्मयुगात दगडांना आकार देण्याच्या पद्धतीला ‘ प्लॅटफॉर्म प्रिपरेशन’ असे म्हटले जाते. अश्मयुगात त्याचा शोध लागला. या पद्धतीचा वापर करुन अश्मयुगीन काळात दगडांची हत्यारे बनवली गेली. आता युगाला ५० हजार वर्षे लोटली आहेत. पण या मानवाला आधुनिक युगाची दूरदृष्टी होती असेच म्हणावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -