पॉइंट जिंकण्यासाठी महिलेने ऑफिसला घातला ७ कोटींचा गंडा, कारण ऐकून मालकही चक्रावला

Australia woman steal 7 crore rupees from employer to play online gambling ashas
पॉइंट जिंकण्यासाठी महिलेने ऑफिसला घातला ७ कोटींचा गंडा, कारण ऐकून मालकही चक्रावला

एका महिलेने आपल्या वाईट सवयीसाठी चक्क आपल्या ऑफिसला ८ कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या महिलेने हे सगळं केवळ जुगार खेळण्याच्या व्यसनापायी केले आहे. अनेकांना जुगार खेळण्याचे व्यसन असते आणि हे व्यसन काही केल्या सुटत नाही. काही जण यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात मात्र कितीही प्रयत्न केले तरी ते शक्य होत नाही. अशात अनेकांचा पैसा तर खर्च होतोच पण मान- प्रतिष्ठा पणाला लागते. अशाच जुगाराच्या व्यसनापायी एका महिलेने आपल्या ऑफिसला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्याची घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे.

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या रकेल नाओमी पेरी या महिलेला ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद होता. विशेष म्हणजे या जुगारातून तिला पैसाही मिळत नव्हता. मात्र केवळ पॉईंट्स मिळवण्याच्या मोहापायी तिने ऑफिसचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले. महिलेला ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी लागणारे पॉईंट्स खरेदी करण्यासाठी पैसे भरावे लागत होते. हा जुगाराचा डाव ती जिंकली तरी तिला पैशांच्याबदल्यात केवळ पॉईंट्सचं मिळत होते. ऑनलाईन जुगाराचा हा गेम जिंकला किंवा हरला तरी पैसे भरूनचं नवा डाव खेळता येत होता. आणि यासाठी महिलेने आपल्या ऑफिसमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केला. ऑफिसच्या पैसातून ही महिला गेम खेळत होती.

रकेल नाओमी पेरी ही महिला एका व्हेटर्निटी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. २०१६ ते २०१९ दरम्यान तिने ऑफिसमध्ये आर्थिक गैरव्यवहार केले. या ऑफिसमध्ये ती मॅनेजर पोस्टवर काम करत होती. रकेलकडे ऑफिसच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची जबाबदारी होती. मात्र या तीन वर्षांच्या काळात तिने ऑफिसमध्ये जवळपास ४७५ इतके गैरव्यवहार केले. यात तिने ऑफिस मालकाचा गैरफायदा घेत स्वत;चं नवं बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि इतर अनेक गोष्टींसंबंधीत गैरव्यवहार केले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे ९० च्या दशकात तिने ५ लाखांपेक्षा अधिकच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाल्याने तिला अटक करण्यात आली होती, मात्र यानंतरही तिने पुन्हा एकदा ऑनलाईन जुगाराच्या पायी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे.