घरट्रेंडिंगएवढा उन्हाळा; चक्क गाडीवर शिजवले मांस!

एवढा उन्हाळा; चक्क गाडीवर शिजवले मांस!

Subscribe

ऑस्ट्रेलियामधील एका माणसाने बाहेरचे वातावरण प्रचंड तापलेले असल्यामुळे आपल्या गाडीत डुक्कर शिजवण्याचा प्रयोग केला.

उष्मा म्हटले की घराबाहेर पडणे कसे टाळता येईल हा विचार सगळ्यात आधी डोक्यात येतो. उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडणे हे टाळले जाते आणि गरमीचे दिवस मुळात जास्त कोणाला आवडत देखील नाही. मात्र ऑस्ट्रेलियातील एका माणसाने वाढलेल्या तापमानाकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले. स्टु पेन्गली या माणसाने बाहेरचे तापमान प्रचंड वाढले आहे हे पाहून एका वेगळ्या प्रयोगाचा विचार केला. बाहेर जेव्हा वातावरण तापलेले असते तेव्हा गाड्यांमधील तापमान हे अधिक वाढते. हाच विचार करत पेन्गली यांनी त्यांच्या तापलेला गाडीत चक्क डुक्कर शिजवण्याचा प्रयोग केला.

या प्रयोगाबद्दलचा पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवर अपलोड केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे १.५ किलोचे डुक्कर त्यांच्या डॅटसन सनी या गाडीत ठेवून शिजवले. डुक्कराला पूर्णपणे शिजायला १० तास लागले. त्यांनी आपल्या गाडीच्या सिटवर एक बेकिंग टिन ठेवला आणि त्यात त्यांनी डुक्कराचं मास ठेवले. ‘हा प्रयोग अप्रतिम झाला’ असं म्हणत त्यांनी आपल्या फेसबुकवर या प्रयोगाचे फोटो टाकले.

- Advertisement -

WARNINGThose of you who missed my experiment for fun yesterday, I cooked 1,5 kg pork roast inside an old Datsun Sunny…

Stu Pengelly ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 13, 2019

या पोस्टरमध्ये त्यांनी दिवसभराच्या तापमावाढाबद्दल देखील सांगितले आहे. दुपारी १ वाजताचे तापमान हे तब्बल ८० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले. तर पेन्गली यांच्या या अनोख्या प्रयोगावर बाकी नेटकऱ्यांनी आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी पुढच्या वेळेस हा प्रयोग केल्यास आमंत्रण देण्यास सांगितले तर काहींनी त्यांच्या अनोख्या प्रयोगाबद्दल सांगितले.

- Advertisement -
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

तर पेन्गली यांनी या गंमतीशीर पोस्टखाली एक महत्तवाचा संदेश देखील दिला आहे. बाहेरचे तापमान जेव्हा वाढते तेव्हा गाड्यांमधील तापमान हे अधीक वाढते त्यामुळे आपल्या लहान मुलांना किंवा कुत्र्यांना एक मिनीटही तापलेल्या गाडीत सोडून येऊ नये असा संदेश पेन्गली यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी दिला आहे.


हेही वाचा: तरुणांनो नोकरीच्या शोधात आहात? प्रतिक्षा संपली! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -