धक्कादायक! मुलीनेच केले आईच्या अंघोळीचे इन्स्टाग्राम लाईव्ह

Baby girl started making live video of mom taking bath in bathroom
धक्कादायक! मुलीनेच केले आईच्या अंघोळीचे इन्स्टाग्राम लाईव्ह

आजकालच्या लहान मुलांना सर्वकाही समजू लागले आहे. ते मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सहजरित्या वापरतात. यामुळे अनेक मुलांचे नुकसान झाले आहे. नुकतीच एका मुलीची अशी एक धक्कादायक घटना समोर आली, जी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. आई बाथरुममध्ये अंघोळ करत असताना तिच्या छोट्या मुलीने जी काही गोष्टी केली आहे, ज्यामुळे आईच्या डोक्याचे टेक्शन वाढले आहे. या छोट्याशा मुलीने आपल्या आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह केला आणि त्याबाबत आईला काहीच माहिती नव्हते. जेव्हा महिला बाथरुममधून अंघोळ करून बाहेर आली आणि तिने इन्स्टाग्राम पाहिले तर तिला धक्काच बसला. ही घटना अमेरिकेत घडली आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या महिलेने याबाबत स्वतः सोशल मीडिया स्पेसमधील लोकांना सांगितले. महिलेने सांगितले की, ‘जेव्हा ती बाथरुमध्ये अंघोळ करत होती, तेव्हा ही घटना घडली. यादरम्यान तिला आपली छोटी मुलगी काय करत आहे, हे माहित नव्हते. तिच्या जवळपास मुलगी आहे, हे तिला महत्त्वाचे होते.’

यादरम्यान मुलीने आईचे इन्स्टाग्राम अकाउंट उघडले आणि लाईव्ह केले. मग तिने बाथरुमध्ये अंघोळ करत असलेल्या आपल्या आईचा व्हिडिओ काढला. यावेळेस महिलेला माहिती नव्हते की, मुलगी लाईव्ह करत आहे. जेव्हा महिला अंघोळी करून बाहेर आली तेव्हा तिने मोबाईल घेतला. तर तिच्या मोबाईलमध्ये धडाधड नॉटिफिकेशन येते होते, हे पाहून तिला धक्काच बसला. इन्स्टाग्राम लाईव्ह झाल्याचे तिला समजले. महिलेने पटकन व्हिडिओ डिलीट केला. हा व्हिडिओ किती वेळं लाईव्ह शूट केला गेला, याचा उल्लेख करण्यात आला नाही आहे.

सध्या महिला या धक्क्यातून बाहेर आली आहे. महिलेने सांगितले की, ‘तिची मुलगी खूप लहान आहे आणि तिला मोबाईल वापरता येत नव्हता. परंतु ती वेगवेगळी बटण दाबत होती. असेच करून तिच्या हातून इन्स्टाग्राम लाईव्ह झाले.’


हेही वाचा – mountain gorilla : १४ वर्षांपूर्वी जीव वाचणाऱ्या व्यक्तीच्या कुशीतच ‘माउंटेन गोरिल्ला’ने सोडला प्राण