घरट्रेंडिंगभावासाठी जीवपण! सख्ख्या भावाचा जीव वाचण्यासाठी दोन बहिणींनी केलं यकृत दान

भावासाठी जीवपण! सख्ख्या भावाचा जीव वाचण्यासाठी दोन बहिणींनी केलं यकृत दान

Subscribe

रक्षाबंधन हा बहीण- भावाच्या अतुट नात्यातील एक क्षण असतो. रक्षाबंधनादिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो. बहीण आपल्या भावाला राखी बांधते त्यानंतर भावाकडून तिला एक स्पेशल गिफ्ट मिळते. मात्र उत्तरप्रदेशातील दोन बहिणींनी आपल्या भावासाठी जीव हाजीर केला आहे. या दोन बहिणींनी आपल्या भावाचा जीव वाचण्यासाठी त्याला आयुष्य़ाभराची गोष्ट दिली आहे. या दोघांनी आपलं एक एक यकृतकडून भावाला दिलं आहे.

उत्तरप्रदेशातील बदाय़ूमधील १४ वर्षीय अक्षतला त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणींकडून मिळालेलं हे मोठं गिफ्ट तो आयुष्यभर विसरु शकणार नाही. त्याला २२ वर्षीय बहिण प्रेरणा आणि २९ वर्षाची नेहा अशा दोन बहिणी आहेत. या दोघींना आपलं यकृत दान करुन आपल्या भावाचा जीव वाचवला आहे.

- Advertisement -

१४ मे रोजी अक्षतची तब्यच अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीदरम्यान त्याला कावीळ झाल्याचे निदान झाल्याने त्यावर उपचार सुरु होते. उपचार करुनही त्याची तब्येत दिवसेंदिवस आणखीनच खालावर असल्याने त्याला मेंदाता रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी केलेल्या तपासणीत त्याचं लिव्हर फेल झाल्याचे समोर आले.

यावेळी अक्षतचं वजन ९३ पर्यंत झालं होतं. पोटात पाणी भरत असल्याने सूज आली होती. त्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. यामुळे लवकरात लवकर त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती.

- Advertisement -

यावर मेदांता रुग्णालयातील पीडियाट्रिक लिव्हर डिसीज अँड ट्रान्सप्लांटेशनच्या डॉ.नीलम मोहन यांनी सांगितले की, अक्षतला रुग्णालयात आणले तेव्हा त्याची परिस्थिती खूपच गंभीर होती. दोन ते तीन दिवसांत त्यांच लिव्हर ट्रान्सप्लांट झालं नाही तर त्याच्या जीवाला धोका होता. मात्र त्याला यकृत कोण करणार असा प्रश्न होता. तसेच यकृत मिळेल आणि त्यानंतर त्याला देण्यात येईल इतका वेळ नव्हता. त्यामुळे कुटुंबातीलचं कुणीतरी यकृत दान करावे असं सांगण्यात आले.

यावेळी अक्षतचा जीव वाचवण्यासाठी त्याचा दोन्ही बहिणी धावून आल्या. या दोघींनी आपल्या यकृताचा अर्धा अर्धा भाग आपल्या सख्ख्या भावाला दिला. मात्र हे ऑपरेशन खूप आव्हानात्मक होते असा डॉ. ए एस सोइन यांनी सांगितले. एका बहिणीच्या लिव्हरची वजन फक्त 0.5 ते 0.55% होतं. त्यामुळे आम्हाला दोन्ही बहिणींचं लिव्हर घ्यावं लागलं, असं डॉ. ए एस सोइन यांनी सांगितलं.

जगातील हे पहिलंच प्रकरण होतं. जिथे दोन वेगवेगळ्या डोनरच्या लिव्हरचा भाग जोडून एक लिव्हर बनवत ट्रान्सप्लांट करण्यात आलं आहे. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हे ऑपरेशन झालं आहे. १५ हे ऑपरेशन सुरु होत. आठवडाभर या तिघांच्याही प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आलं. आता तिघांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


धक्कादायक! नागपूर विद्यापीठाच्या डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची पतीच्या निधनानंतर आत्म्यहत्या


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -