राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या Amazon, Flipkart वर कारवाई करा; हिंदू जनजागृती समिती

Indian Flag msk
भारतीय तिरंग्याचा मास्क वापरण्यास मनाई

‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशील विषयाचे गांभीर्य न ठेवता ॲमेझॉन, इंडियामार्ट, फेमअसशॉप, मिंत्रा, स्नॅपडील, फ्लिपकार्ट यांसारख्या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १५ ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

याच आशयाचे निवेदन पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व आणि नालासोपारा पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आले आहे. निवेदन देतांना योग वेदांत समितीचे सर्वश्री राजू बरनवाल, उदय शुक्ला, हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद काळे यांसह अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Photo: तिरंग्याच्या मास्कचा निषेध

 

राष्ट्रध्वज हे काही सजावट करण्याचे माध्यम नाही. अशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणे, त्याला थुंकी लागणे, तो अस्वच्छ होणे, तसेच शेवटी वापरानंतर कचर्‍यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार आहे आणि असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५० कलम २ व ५ नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ चे कलम २ नुसार व ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय गुन्हा आहे. तरी शासनाने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

हिंदु जनजागृती समिती गेली १८ वर्ष ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही मोहीम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देतांना ‘शासनाने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना आणि त्याचा अवमान रोखावा’ अशी शासनाला विनंती  आहे. – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, (हिंदु जनजागृती समिती)