घरट्रेंडिंगतुम्हाला Whats app स्टेटस ठेवा, पैसे कमवा असा मॅसेज येतोय का?; जाणून...

तुम्हाला Whats app स्टेटस ठेवा, पैसे कमवा असा मॅसेज येतोय का?; जाणून घ्या माहिती नाहीतर होईल नुकसान

Subscribe

सध्याचे युग हे स्मार्टफोनचं युग आहे. हातात स्मार्टफोन आल्याने इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. परिणामी या इंटरनेटच्या जगात गुन्हेगारी देखील वाढली आहे. गुन्हेगार नवीन प्रलोभनं देऊन लोकांना लुटतात. अशाच पद्धतीने लोकांना लुटण्यासाठी काही दिवसांपासून एक लिंक Whats app वर फिरत आहे. Whats app वर स्टेटस ठेवून पैसे कमवा, असा मॅसेज फिरत आहे. पैसे कमावण्यासाठी तुम्हाला व्यक्तीगत माहिती मागितली जाते. अनेकांनी पैसे कमावण्याच्या लालसेपोटी लिंकद्वारे माहिती भरली आहे.

इंटरनेटद्वारे लुटलं जात असताना देखील लोकं शॉर्टकट पणे पैसे कमाण्याच्या नादात प्रलोभनांना बळी पडतात. आता एक लिंक शेअर होत आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की, Whats app स्टेटसद्वारे पैसे कमवू शकता. यााठी तुम्हाला एक लिंक Whats app स्टेटसवर ठेवावी लागेल. त्यानंतर ती लिंक ओपन केल्यावर तुम्हाला त्यात तुमची माहिती भरण्यास सांगितली जाते. या लिंकमध्ये ३६ जिल्ह्यांची नावे त्यामध्ये आहेत. शिवाय, तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी किंवा स्वत:चा मोबाईल नंबर भरावा लागतो. त्यानंतर एक लिंक येते. ती तुम्हाला Whats app स्टेटसवर शेअर करावं लागतं. जर हा स्टेटस ३० हून अधिक जणांनी पाहिला, तर ५०० रुपये मिळणार असं लिंकद्वारे सांगितलं जातं. आता पर्यंत या प्रलोभनाला अनेक जण बळी पडले आहेत. मात्र, प्रलोभनाद्वारे तुम्हाला लूटलं जाऊ शकतं. मात्र, सायबर सेल या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहे. मात्र, अशा लिंकद्वारे तुम्हाला प्रलोभनं देऊन तुम्हाला लुटलं जाऊ शकतं.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -