घरटेक-वेकव्हॉट्सअॅपवरून 'या' गोष्टी शेअर करताना सावधान, नाहीतर होऊ शकतो तुरुंगवास

व्हॉट्सअॅपवरून ‘या’ गोष्टी शेअर करताना सावधान, नाहीतर होऊ शकतो तुरुंगवास

Subscribe

नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप आपल्या रोजच्या जगण्यातला भाग झाला आहे. मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवण्यापासून ते पैसे पाठवण्यापर्यंत सर्व सुविधा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध झाल्या आहेत. तसंच, व्हॉट्सअॅपने आपल्या नियमांतही कठोरता आणली आहे. वापरकर्त्यांना सुरक्षा देण्याकरता व्हॉट्सॅपकडून विविध नियम बनवण्यात आले आहेत. असेच, काही नियम आहे ज्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी काही लोकांना ताब्यात घेतले होते. चाईल्ड पोर्नोग्राफीसंबंधित यांना ताब्यात घेतले होते. चाईल्ड पोर्नोग्राफी कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे, चाईल्ड पोर्नोग्राफीशीसंबंधित कोणताही व्हिडीओ किंवा फोटो तुम्ही व्हॉट्सअॅपला शेअर केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

- Advertisement -

सामाजिक अस्थिरता निर्माण करणारे व्हिडीओही शेअर करणं कायद्याने गुन्हा आहे. सामाजित वितुष्टता निर्माण करणारे व्हिडीओ तुम्हाला येत असल्यास तुम्ही ते तत्काळ डिलिट केले पाहिजेत. कारण, असे व्हिडीओ तुम्हाला तुरुंगात टाकू शकतात.

फेक न्युजमुळेही तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. एखादी खोटी माहिती तुम्ही पसरवल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता. त्यामुळे तुमच्या मित्र मैत्रीणीला किंवा कुटुंबाला काहीही फॉरवर्ड करण्याआधी विचार करा. प्रत्येक गोष्टीची खातरजमा करा. व्हायरल करण्याआधी संबंधित विषयाची माहिती करून घ्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -