Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग कोलेस्ट्रॉलसह वजनही कमी करायचय; मग करा चण्याचे सेवन

कोलेस्ट्रॉलसह वजनही कमी करायचय; मग करा चण्याचे सेवन

Related Story

- Advertisement -

बऱ्याचदा आपल्या आहारात कडधान्यांचा समावेश असतो. पण, कोणत्या कडधान्याचे सेवन केल्याने आपल्याला फायदा अधिक होतो, हे बऱ्याचदा ठाऊक नसते. अनेकदा आपण एखादी गोष्ट आवडते म्हणून खातो. तर काहीवेळा ती गोष्ट आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते म्हणून आपण त्याचे सेवन करतो. पण, एखादी गोष्ट खाण्यपूर्वी जर त्या पदार्थांचे फायदे माहिती असतील तर तो पदार्थ आपण अधिक आवडीने खातो. चला तर जाणून घेऊया चण्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला नेमके कोणते फायदे होतात.

शक्ती वाढवण्यासाठी

ज्या व्यक्तींना शक्तिशाली बनायचे आहे, अशा व्यक्तींने चण्याचे सेवन करावे. तसेच जिमला जाणाऱ्या व्यक्तींना देखील चणे खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

पचनशक्ती सुधारते

- Advertisement -

चणे हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. चण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

वजन वाढण्यास उपयुक्त

तुम्हाला जर तुमचे वजन वाढवायचे असेल तर चण्याचे सेवन करावे. मात्र, हे चणे गुळासोबत खाल्ल्याने अधिक फायदा होतो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

- Advertisement -

चण्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होते.

वजन कमी करण्यास होते मदत

चण्याचे पीठ आणि गव्हाच्या पिठात एकत्र करुन त्याची पोळी केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. ज्या व्यक्तीला वजन कमी करायचे आहे, अशा व्यक्तीने चणा पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र केलेल्या पिठाच्या पोळीचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

मधुमेह नियंत्रणात राहतो

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी चण्याच्या पिठ्याच्या पोळीचे सेवन करावे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.


हेही वाचा – नवजात बाळाला लगेच घराबाहेर नेऊ नका! वाचा कारण


 

- Advertisement -