बिग बॉस सिझन २ – वीणाला आपलाच ग्रुप झालाय नकोसा

त्यामुळे, बिग बॉसच्या घरात तयार झालेला हा ग्रुप आता हळूहळू फुटणार का? परागमुळे वीणा, किशोरी आणि रूपाली या तिघींमध्ये गैरसमज निर्माण होतील का? हा ग्रुप फुटल्यावर कोणाचा फायदा होईल? तसेच कोणाला याचा अधिक फटका बसेल, हे येत्या काही दिवसात कळेल.

bigboss
veena jagtap in big boss

बिग बॉसच्या घरात भांडणं, अविश्वास आणि प्रेम प्रकरणं यांसारख्या गोष्टी घडतंच राहतात. बिग बॉस सिझन २ ची जोरदार सुरुवात झाली आहे. दुसऱ्या सिझन केव्हीआर ग्रुपच्या वीणाने धक्कादायक खुलासा केला आहे. ग्रुपमधील लोकांचा तिच्यावर विश्वास नसल्याचे तिने सांगितले आहे. यामुळे ती हा ग्रुप सोडते का? याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

बिग बॉस सुरु होऊन काही दिवसांतच केव्हीआर हा ग्रुप तयार झाला होता. याआधी केव्हीआर ग्रुपमध्ये किशोरी, वीणा, रुपाली यांचा समावेश होता. त्यानंतर पराग आणि शिव या ग्रुपमध्ये सहभागी झाले. परंतु, आता या ग्रुपमध्ये भांडणं, एकमेकांवर अविश्वास दाखवणे अशा गोष्टींची सुरुवात झाली आहे. यामुळे या ग्रुपचा भाग बनवून राहण्यात काहीच अर्थ नाही असे वीणाने सांगितले आहे. अलिकडेच या ग्रुपचा भाग बनलेला शिववर परागचा विश्वास नाही. शिव आपल्या ग्रुपच्या गोष्टी बाहेर सांगेल अशी भीती परागला वाटते. वीणा आणि शिवची मैत्री झाल्यामुळे परागला वीणावरही विश्वास राहिलेला नाही. यांच्या मैत्रीचा फटका ग्रुपला बसेल असे परागला वाटत आहे. आपल्याच ग्रुपचा आपल्यावर विश्वास नाही, अशी वीणाने खंत व्यक्त केली आहे. “बिग बॉस सुरु होऊन १७- १८ दिवस उलटले तरीदेखील आपल्या ग्रुपमधील लोक माझ्यावर विश्वास दाखवत नसतील तर, या मैत्रीला काय अर्थ आहे? मग मला ग्रुप सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.” असे वीणा म्हणाली.

त्यामुळे, बिग बॉसच्या घरात तयार झालेला हा ग्रुप आता हळूहळू फुटणार का? परागमुळे वीणा, किशोरी आणि रूपाली या तिघींमध्ये गैरसमज निर्माण होतील का? हा ग्रुप फुटल्यावर कोणाचा फायदा होईल? तसेच कोणाला याचा अधिक फटका बसेल, हे येत्या काही दिवसात कळेल.