घरट्रेंडिंग'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार'पासून ते 'पॉवरी गर्ल'पर्यंत; रातोरात बदलले अनेकांचे नशीब

‘कच्चा बदाम’, ‘बचपन का प्यार’पासून ते ‘पॉवरी गर्ल’पर्यंत; रातोरात बदलले अनेकांचे नशीब

Subscribe

सहदेव दिर्डो, रानू मंडल, प्रोफेसर संजीव श्रीवास्तव, पाकिस्तानमधील 19 वर्षीय दनानीर मुबीन आणि आता कच्चा बदाम गाणारा गायक भुबन बदयाकर यांसारख्या अनेकांना आज सोशल मीडिया युजर्सने रॉकस्टार बनवले आहे. सोशल मीडियावरील लाखो युजर्स आज या सर्वांचे व्हिडीओंना तुफान व्हायरल करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे या सर्वांचे नशीब रातोरात एका स्टारप्रमाणे बदलले आहे. आज भारतातच नाही तर जगभरा त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. तर सोशल मीडियावरही त्यांचे लाखोंच्यावर फॉलोवर्स आहे.

भुबन बदयाकर

- Advertisement -

एका शेंगदाणा विक्रेता ते आज संगीत क्षेत्रातील चर्चेचा विषय ठरलेला भुबन बदयाकर सोशल मीडियावर सध्या पहिल्या नंबरवर आहे. सोशल मीडियावर त्यांच्या कच्चा बदाम गाण्याची जोरदार हवा सुरु आहे. यूट्यूब, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या गाण्यावरील डान्स स्टेप व्हायरल होत आहे. भुबन बदयाकर यांची वाढलेली प्रसिद्ध पाहता आता त्याला पश्चिम बंगालमधील एका क्लबमधून गाण्याची ऑफर देण्यात आली आहे. भुबन बदयाकर एक शेंगदाणा विक्रेता असून त्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कच्चा बदाम हे गाणं तयार केले होते. कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकण्यासाठी दररोज तो 3- 4 किलो शेंगदाणे विकून 200-250 रुपये कमवत होता.

सहदेव दिर्डो

- Advertisement -

2021 मध्ये सोशल मीडियार सहदेव दिर्डोचा बोलबाला पाहायला मिळाला. छत्तीसगडमधील 12 वर्षीय सहदेवचे नशीब बचपन का प्यार या गाण्यामुळे रातोरात बदलले. सोशल मीडियावर सहदेवच्या आवाजातील व्हायरल व्हिडीओनंतर बॉलिवूडमधील फेमस बादशाह याने त्याच्यासोबत एक म्युझिक व्हिडीओही बनवला आहे. जो सुपरहिट ठरला आहे. याशिवाय सहदेव अनेक टेलिव्हिजन शोमध्ये पाहुणा कलाकार म्हणून देखील दिसला.

दनानीर मुबीन

‘हे हम है…’ असं म्हणत ‘हमारी पावरी हो रही है’ असं म्हणत गेल्या वर्षी पाकिस्तानमधील 19 वर्षीय दाननीर मोबीनच्या व्हिडीओने व्हिडीओने सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घातला होता. तिने पार्टीला पावरी म्हणणे युजर्सला इतके आवडले की दाननीर रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली होती. तिचा एक अवघ्या काही सेकंदांचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला. तिचा तो व्हिडीओ व्हायरल होताच सर्वांनी तिला गुगलवर सर्च करण्यास सुरूवात केली होती. दाननीरचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

प्रिया प्रकाश वारियर

2018 मध्ये सोशल मीडियावर आणखी एका व्हिडीओने धमाका केला होता. त्या व्हिडीओमधील एका मुलीच्या डोळ्यांच्या हावभावाने सोशल मीडियावर अनेकांना घायाळ केले. ती मुलगी दुसरी कोणी नसून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर होती. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना तिच्याबद्दल कळले. त्या दिवसांत प्रिया प्रकाश वारियरचा 26 सेकंदांचा एका व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि प्रियाने सोशल मीडियावर तिने 1 दिवसात लाखो फॉलोअर्स जमवले.

ढिंचॅक पूजा

युट्यूबवर रॅप म्युझिकचे व्हिडिओ टाकणारी ढिंचॅक पूजा तुम्हाला चांगलीच माहिती असेल. यूट्यूबवरील लोकप्रियतेमुळे ढिंचक पूजाला बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली. ढिंचॅक पूजा ही बिग बॉस 11 ची स्पर्धक होती. मूळची दिल्लीची असलेली ढिंचॅक पूजा ‘सेल्फी मैने ले ली आज’ गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आली. 2017 मध्ये ती सोशल मीडिया सेन्सेशन बनण्यात यशस्वी झाली.

प्रोफेसर संजीव श्रीवास्तव

2018 मध्ये मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणारे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव सोशल मीडियावरील डान्सिंग अंकल म्हणून प्रसिद्ध झाले. संजीव श्रीवास्तव हे त्यांच्या छोट्या शहरात गोविंदाच्या नृत्यशैलीची कॉपी करण्यात माहिर मानले जात होते. एका लग्न समारंभात गोविंदाचे प्रसिद्ध गाणे ‘आपने आ जाने से…’ सादर करताना संजीव श्रीवास्तव यांची नृत्य प्रतिभा समोर आली. यादरम्यान संजीव श्रीवास्तव यांनी गोविंदाच्या हुबेहुब नृत्यशैलीची नक्कल करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि त्यांचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. इतकेच नाही तर मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून त्यांच्या व्हिडिओचे कौतुक केले. संजीव श्रीवास्तव यांनाही त्यांच्या टॅलेंटमुळे टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये गोविंदासोबत डान्स करण्याची संधी मिळाली.

रानू मंडल


2019 मध्ये हिमेश रेशमियाने लता मंगेशकर यांचे ‘प्यार का नगमा’ गाणे गाऊन रातोरात प्रसिद्ध झालेल्या रानू मंडलला कामावर घेतले होते. राणूने हिमेशसोबत ‘तेरी-मेरी कहानी’ हे गाणे गायले. हिमेशच्या ऑफर्सनंतर रानू मंडल टीव्ही शो आणि इव्हेंटमध्ये दिसली. मात्र, प्रसिद्ध होण्यापूर्वी रानू मंडल पश्चिम बंगालमधील राणाघाट स्टेशनवर गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करत होती. एके दिवशी तिथून जात असताना यतींद्र चक्रवर्ती यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. रानू मंडलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ती रॉकस्टार बनली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -