भयंकर! चिमुरडीच्या डोळ्यात जन्मदात्या आईने पाडले भोकं आणि कापली जीभ!

भयंकर! जन्मदात्या आईनंच चिमुरडीचे डोळे फोडले, कापली जीभ

जन्मदात्या आईनेच तिच्या चिमुरड्या मुलीचे डोळे फोडले आणि जीभ कापल्याचा भयंकर प्रकार ब्राझील मधून समोर आला आहे. ही जन्मदाती आई ब्राझीलमध्ये राहण्यास असून तिच्यावर तिच्या स्वतःच्या ५ वर्षाच्या मुलीला मारण्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेने तिच्या पोटच्या मुलीचे डोळे फोडले आणि जीभ देखील कापून तिची हत्या केली, असे सांगितले जात आहे.

Josimare Gomes da Silva नाव असणाऱ्या महिलेचे वयवर्ष ३० असून या महिलेला Sao Cristovao मधील तिच्या घरातून तिला रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. या चिमुकलीच्या आजोबांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. ही माहिती पोलिसांना देतांना आजोबांनी असे सांगितले की, da silva ने आपल्या मुलीसह स्वतःला बाथरूममध्ये लॉक करून घेतले. यावेळी बाथरूममधून रक्त येताना या चिमुकलीच्या आजोबांनी पाहिले आणि ते थक्क झाले. त्यानंतर त्यांनी दार उघडून पाहिले असता ही चिमुकली तिच्या आईजवळ झोपलेल्या अवस्थेत होती आणि तिची आई तिच्यासाठी प्रार्थना करताना दिसली.

da silva या महिलेने पोलिसांना आपले निवेदन दिले असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेचा तपास करणार्‍यांनी सांगितले की, जेव्हा या महिलेने पाहिले की आपली मुलगी जिवंत आहे, तेव्हा तिने पुन्हा तिच्यावर कात्रीने वार करून हल्ला करण्यास सुरूवात केली. दरम्यान, da silva ने आपल्या मुलीचे डोळे भोसकले होते आणि तिची जीभ देखील कापली होती अशी चर्चा सुरू होती. ते तिने स्पष्टपणे नाकरले असल्याचेही सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Da Silva गेल्या काही काळापासून मानसिक ताण-तणावाचा सामना करत आहे. त्यामुळे ती पूर्णतः डिप्रेशनमध्ये होती. त्यामुळे तिने आपल्यामुली सोबत असे धक्कादायक कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घडलेल्या घटनेचा तपास अद्याप सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.