Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग BIS Recruitment 2021: ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये वैज्ञानिक पदांसाठी भरती, GATE क्वालिफाईड...

BIS Recruitment 2021: ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये वैज्ञानिक पदांसाठी भरती, GATE क्वालिफाईड असणाऱ्यांना संधी

Related Story

- Advertisement -

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने वैज्ञानिक (Scientist-‘B) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. त्याअंतर्गत एकूण २६ पदे भरती करण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.bis.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 5 जून 2021 पासून सुरू झाली असून ती 25 जून 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. बीआयएसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड सिव्हील अभियांत्रिकी / इंस्ट्रमेंटेशन अभियांत्रिकी / पर्यावरण अभियांत्रिकी / रसायनशास्त्र / टेक्सटाइल अभियांत्रिकीमध्ये गेट परीक्षा 2019, 2020 आणि 2021 च्या आधारे करण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे असणं बंधनकारक आहे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.

  • नोटिफिकेशन प्रसिध्द होण्याची तारीख- 5 जून, 2021
  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख- 25 जून, 2021
  • फी जमा करण्याची शेवटची तारीख- 25 जून, 2021

अशी आहे पदं

  • पर्यावरण अभियांत्रिकी- 02
  • सिव्हिल अभियांत्रिकी- 02
  • रसायनशास्त्र- 07
  • टेक्सटाइल अभियांत्रिकी- 04

अशी होणार उमेद्वाराची निवड

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जीएटीटी परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलविण्यात येणार असून निवड करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अर्जदार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात. तसेच उमेदवारीची निवड झाल्यास त्याला सुरूवातीला 87,525 इतका पगार देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -