घरट्रेंडिंगकेकमुळे वाचला दोन भावांचा जीव

केकमुळे वाचला दोन भावांचा जीव

Subscribe

अडचणीच्या प्रसंगी कोण कसं मदतीला येईल सांगता येत नाही. परंतु दोन भावांच्या मदतीला चक्क केक उपयोगी पडला आहे. होय… चक्क केकमुळे दोन भावांचा बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. हे वाचून थोडं आश्चर्य वाटले असे परंतु ही गोष्ट खरोखर मध्य प्रदेशात घडली आहे.

मध्य प्रदेशातील बुरहानपूर भागातील फिरोज नामक व्यक्ती मुलाच्या वाढदिवसानिमित्त छोटी पार्टी आयोजित केली होती. यावेळी फिरोज आणि त्याचा भाऊ वाढदिवसाचा केक आण्यासाठी गेले. हा केक बाईकवरून घेऊन येत असतानाच रस्त्याच्याकडे जवळील ऊसाच्या शेतातून दबा धरुन बसलेला बिबट्या अचानक बाहेर आला. यावेळी फिरोज आणि त्याच्या भावाची घाबरगुंडी उडाली.

- Advertisement -

दोघही बाईकवर असल्याने काय करावे दोघांनाही सुचत नव्हते, फिरोज बाईक चालवत होता तर त्याचा भाऊ केक घेऊन मागे बसला होता. अशा परिस्थितीत जीव वाचण्यासाठी बाईकची स्पीड वाढवली तरी बिबट्या हल्ला करणार हे निश्चित होते. यामुळे काय करावे दोघांनाही सुचत नव्हते. इतक्यात गाडीवर मागे बसलेल्या फिरोजच्या भावाने हातातील केकचा बॉक्स बिबट्याच्या तोंडावर फेकून मारला.

केक बिबट्यावर फेकताच तो बिवट्याचा संपूर्ण शरीराभर पसरला. यानंतरही बिबट्या दुचाकीचा पाठलाग करू लागला. त्यांनी गाडीचं स्पीडही वाढवलं, तरीही बिबट्या त्यांच्या मागे धावत राहिला. बिबट्यानं उडी घेत गाडी खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ५०० मीटर अंतरापर्यंत काही वेळ धावल्याने थकलेला बिबट्या पुन्हा मागे फिरला. मागे बिबट्या पळत नसल्याचे पाहून या दोन्ही भावांनी सुटकेचा श्वास सोडला. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बुरहानपुरमधील गोराडिया येथील नेपानगरमधील आहे.

- Advertisement -

गोराडिया येथील रहिवासी फिरोज भाऊ साबिर याच्यासोबत केक आणायला नेपानगर येथे गेले होते. केक घेऊन पुन्हा घरी येत असताना सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. हा संपूर्ण जंगल परिसर असल्याने नेपानगर, नावरा आणि सिव्हिल क्षेत्रात बरेच बिबटे आहेत. शिवाय इतरही प्राणी दिसतात. याठिकाणी वनविभागाने अनेक सुचना बोर्डही लावण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून या भागांत माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे.


मायग्रेनचा त्रास होतोय? मग व्यायमासह आहारात करा या पदार्थांचा समावेश…


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -