घरट्रेंडिंगऐकलंत? या CCTVला समजणार तुमचं 'लिंग'!

ऐकलंत? या CCTVला समजणार तुमचं ‘लिंग’!

Subscribe

ऐकलंत? आता सीसीटीव्हीपासून तुमचं काहीही लपणार नाही! कारण तुमचे कपडे, उंची आणि लिंग याची माहिती देणारे सीसीटीव्ही लवकरच बाजारात येणार आहेत.

सीसीटीव्ही, माणसाचा तिसरा डोळा. या तिसऱ्या डोळ्याचा वापर करून आपल्याला प्रत्येक घडामोड टिपता येते. सीसीटीव्हीची मदत आत्तापर्यंत केवळ घडामोडी टिपण्यापर्यंतच होत होती. पण, याच सीसीटीव्हीच्या मदतीनं तुमचे कपडे, उंची आणि तुमचं लिंग देखील कळणार आहे. काही कळलं नाही का? अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर सीसीटीव्ही तुम्हाला स्कॅन करू शकतं. ज्यातून तुमची प्रत्येक माहिती संबंधित व्यक्ती किंवा कंपनीला लगेगच कळणार आहे. भारतामध्ये अशा प्रकारचा सीसीटीव्ही तयार करण्यात आला आहे. एकदा का तुम्ही या सीसीटीव्हीमध्ये कैद झालात की तुमची प्रत्येक माहिती ही साठवली जाणार आहे. त्यामुळे चेहरा ब्लर दिसतोय, व्यक्ती ओळखता येत नाहीत यासारख्या तक्रारी आता ऐकता येणार नाहीत, ही विशेष बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आत्तापर्यंत ज्याप्रकारे या सीसीटीव्हीची चाचणी घेण्यात आली आहे त्यामध्ये ४१ पैकी २८ जणांनी ओळख पटवण्यात आली आहे.

सीसीटीव्हीचा वाढता वापर

सध्या सीसीटीव्हीचा वापर वाढत आहे. दुकानं, ऑफिस, इमारत, घर, चौक या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही वापरला जातो. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सीसीटीव्हीच्या मदतीनं त्याचा छडा लावला जातो. पण, बऱ्याच वेळेला सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अपेक्षित असा निकाल मिळत नाही. त्यामुळे मग अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी नवीन प्रकारचे सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या सीसीटीव्हीपासून तुमचं काहीह लपणार नाही. ही विशेष बाब तुम्ही ध्यानात घेतली पाहिजे. नव्या टेक्नॉलॉजीवाले सीसीटीव्ही केव्हा बाजारात येतील याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र तुमची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -