घरट्रेंडिंगChhath Puja 2021: छट पूजा साजरी करण्याचे कारण काय? जाणून घ्या त्यामागची...

Chhath Puja 2021: छट पूजा साजरी करण्याचे कारण काय? जाणून घ्या त्यामागची रंजक कथा

Subscribe

छट पूजेचे व्रत हे ३६ तासांचे कडक व्रत असते. या काळात काही लोक पाणी देखील प्राशन करत नाहीत.

आजपासून देशात छट पूजेला प्रारंभ होत आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष षष्ठीला छट पूजा केली जाते. सूर्य षष्ठी व्रताला असल्याने याला छटपूजा असे म्हणतात. एक वर्षात दोन छट पूजा साजरी केली जाते. पहिली छट पूजा चैत्र महिन्यात तर दुसरी कार्तिक महिन्यात केली जाते. चैत्र शुक्ल पक्ष षष्ठीला म्हणजेच जानेवारी महिन्यात साजऱ्या केलेल्या पूजेला चैती छट म्हणतात तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष षष्ठीला साजऱ्या केलेल्या छट पूजेला कार्तिकी छट पूजा असे म्हणतात. छट पूजेचे व्रत हे ३६ तासांचे कडक व्रत असते. या काळात काही लोक पाणी देखील प्राशन करत नाहीत. छट पूजा साजरी करण्यामागे अनेक पौराणिक आणि रंजक कथा आहेत.

पौराणिक कथांनुसार, लंकेवर विजय मिळवल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी राम राज्य स्थापन केले. तो दिवस होता कार्तिक शुक्ल षष्ठीचा. या दिवशी राम आणि सीतेने उपवास करुन सूर्यदेवाची आराधना केली होती. सप्तमीला सूर्योदयावेळी पुन्हा अनुष्ठान करुन सूर्यदेवाचे आशिर्वाद मिळवले होते. हा दिवस साजरी करण्यामागे आणखी एक रंजक कथा आहे ती म्हणजे दौपदीची पांडवांची पत्नी दौप्रदीने सूर्य देवाची पूजा केल्याचा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. ते आपल्या कुटुंबाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी नियमित सूर्याची पूजा करत होती असे म्हटले जाते. म्हणून देखील छटपूजा साजरी केली जाते असे मानले जाते.

- Advertisement -

छटपूजेची सुरुवात महाभारताच्या काळात झाल्याचे सांगण्यात येते. सूर्य पुत्र कर्णाने सूर्य देवाची पूजा प्रथम पूजा करण्यात सुरुवात केली असे मानले जाते. कर्ण हा सूर्य देवाचा परम भक्त होता. तो दररोज अनेक तास कंमरेभर पाण्यात उभा राहून सूर्य देवाचे ध्यान करत असत. सूर्यदेवाच्या कृपेमुळेच कर्ण एक महान योद्धा बनला असे मानले जाते. कर्णाने सुरुवात केलेली सूर्यदेवाची पूजा आजही केली जात आहे.

छटपूजेचा उल्लेख ब्रम्हवैवर्त पुराणातही आहे. मनु स्वायम्भुवचा पुत्र राजा प्रियव्रतला अनेक वर्ष मुल नव्हते. त्यामुळे राजा फार दु:खी होता. महर्षि कश्यपने राजाला पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करायला सांगितले. त्यानंतर महाराणी मालिनीला पुत्र झाला मात्र तो पुत्र मृत जन्माला आला. तेव्हा आकाशातून एक विमान उतरले त्यात माता षष्ठी विराजमान होती. माता षष्ठी म्हणजे ब्रम्हदेवांची मानसकन्या. माता षष्ठी विश्वातील सर्व बालकांचे रक्षण कते. देवीने मृत बाळाला स्पर्श केला आणि बाळ जिवंत झाले. त्यामुळे या षष्ठी देवीची पूजा केली जाते.

- Advertisement -

हेही वाचा – इन्स्टाग्राम मॉडेलला धार्मिक स्थळासमोर बॉयफ्रेंडसोबत सेक्स प्रँक करणे पडले महागात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -