VIDEO: …आणि ब्रिजखाली अडकलं विमान

भन्नाट कल्पनेनंतर हे विमान ब्रिजखालून काढण्यात आले

चीनच्या हार्बिनमध्ये एक आश्चर्य वाटण्याजोगा प्रकार घडला आहे. हा प्रकार ऐकताच तुम्ही देखील हैराण व्हाल. चीन मधील एका ब्रिज खाली चक्क विमान अडकलं आहे. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोन दिवसांपुर्वी हा व्हिडिओ युट्यूबवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला शेअर झाल्यानंतर साधारण १३ हजार लोकांनी बघितला. ट्विटर अकाऊंटवर आतापर्यंत या व्हिडिओला २७ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला चीनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म वीबोवर देखील शेअर करण्यात आले होते. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

अशी घडली घटना

न्यू चायना वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला त्यावेळी विमान एका ट्रकच्या सहाय्याने नेण्यात येत होते. या बिघाड झालेल्या विमानाला ट्रकच्या सहाय्याने नेत असताना ते ब्रिजखाली अडकते. यावेळी सर्व उपस्थित असणाऱ्यांना या विमानाला कसे ब्रिजखालून काढायचे हा एकच प्रश्न समोर होता.

मात्र यावेळी ट्रक ड्रायव्हरने हे ब्रिजखाली अडकलेले विमान काढण्यासाठी एक युक्ती दिली. त्यांनी हे बिघाड झालेले विमान नेत असलेल्या ट्रकच्या चाकातील हवा काढण्याचा सल्ला दिला. यानंतर ते विमान ब्रिज खालून काढण्यास मदत झाली. नंतर पुन्हा ट्रकमध्ये हवा भरून हे विमान योग्य जागी नेण्यात आले.


Video : आतून जळणारं झाड पाहिलंत का कधी?