घरट्रेंडिंगमाझे लैंगिक शोषण होत होते, नवाजुद्दीन शांतपणे पाहत होता - चित्रांगदा

माझे लैंगिक शोषण होत होते, नवाजुद्दीन शांतपणे पाहत होता – चित्रांगदा

Subscribe

#MeToo या मोहिम आता देशभर व्यापक रूप धारण करत आहे. वेगवेगळ्या अभिनेत्री या मोहिमेद्वारे त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत लोकांमसमोर बोलत आहेत. आता यामध्ये अभिनेत्री चित्रांगदा सिंगनेही उडी घेतली आहे. चित्रांगदानेदेखील तिचा अनुभव कथन केला आहे. चित्रांगदाने सांगितले की नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ हा चित्रपट मी साईन केला होता. २०१७ मध्ये ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली. परंतु मी या चित्रटातून काढता पाय घेतला. त्याला कारणही मोठे होते. चित्रांगदाने सांगितले की, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने कथानकात बदल करून ऐनवेळी मला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बेड सीन करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने वापरलेली भाषाही चुकीची होती. ”तुझी साडी सोड, हिरोच्या अंगावर चढ” आणि अशाच आशयाची अत्यंत अश्लील वाक्य दिग्दर्शक तिला सीन समजावताना वापरत होता. मी अभिनेत्री आहे की आणखी कुणी? असाच प्रश्न मला त्यावेळी पडला. या संपूर्ण प्रकाराला मी विरोध केला. यावेळी नवाजुद्दीन मात्र शांतपणे पाहत बसला होता. तो याविरोधात काहीच बोलला नाही. त्याने माझी बाजूदेखील घेतली नाही. त्यानंतर मी तो चित्रपट न करण्याचे ठरवले व मी तसे केलेदेखील.

नवाजुद्दीनसोबत तो सीन करण्याची माझी तयारी नव्हती. तरीही मला हा सीन करण्याची धमकी दिग्दर्शक आणि निर्मात्याने दिली. हा सगळा प्रकार नवाजच्या समोर सुरु होता. तो काहीतरी बोलेल माझी बाजू घेईल अशी मला अपेक्षा होती पण तो शांत बसला. हे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होते. मी तो चित्रपट सोडून दिला. अभिनेत्रीशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे? असेही तिने विचारले आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकीने यावर काहीही न बोलता शांत राहणे मला आवडले नाही. मला त्याचा राग आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -