घरट्रेंडिंगChristmas 2021: तुमचा Santa claus कुठपर्यंत पोहचला? पहा लाइव्ह Google Santa Trackerच्या...

Christmas 2021: तुमचा Santa claus कुठपर्यंत पोहचला? पहा लाइव्ह Google Santa Trackerच्या वेबसाइटवर

Subscribe

संपूर्ण देशभरात सध्या ख्रिसमसचा उत्साह सुरू आहे. २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याने या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमस म्हटले की सांता क्लॉज आणि त्याचे सुंदर सुंदर गिफ्ट आलेच. लहान मुलांसाठी सांताक्लॉज फार आकर्षणाचा विषय असतो. प्रत्यक्ष सांतक्लॉज येणार नसला तरी लहान मुलांना डिजीटली सातंक्लॉज भेटू शकतो. त्यासाठी गूगलने एक सांता ट्रॅकर वेबसाइट लाँच केली आहे. या वेबसाइटवरुन लहान मुले सांतक्लॉजचे लोकेशन चेक करू शकतात. तसेच सांता मुलांचा काय गिफ्ट देणार आहे हे ही कळू शकते.

कंपनीच्या माहितीनुसार, युझर्स कोणताही स्मॉर्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि आयफोनच्या वेब ब्राउजरवर देखील सांता ट्रॅकर वेब साइवर जाऊन सांता कुठे पर्यंत आला आहे हे पाहू शकतात. वेबसाइटवर सांताचे सध्याचे लोकेशन, त्याचे पुढील थांबण्याचे ठिकाण आणि त्याच्या प्रवासाचा थेट व्हिडिओ सगळकाही मॅपवर पाहता येणार आहे.

- Advertisement -

सांत ट्रॅकर वेबसाइटवर मुलांना मजेशीर गेम देखील खेळता येणार आहे. सांताक्लॉजला झोपेतून उठवणे, सांताची दाढी करणे, त्याला कलर करणे असे अनेक गेम खेळता येणार आहे. अशाप्रकारच्या अनेक वेबसाइट्स वरुन तुम्ही सांता ट्रॅक करू शकता. मात्र गूगलच्या या वेबसाइटवर तुम्ही सर्वात जलद पद्धतीने सांताला ट्रॅक करू शकता. तसेच गूगलच्या या वेबसाइटवर तुम्ही गेम सोबतच व्हिडिओ देखील पाहू शकता.

१९९५मध्ये NORADने सांताला ट्रॅक करण्यासाठी सुरूवात झाली. त्यानंतर गूगलने २००४ पासून सांता ट्रॅकर ही वेब साइट सुरू केली. त्यानंतर गूगलने आता सांता सेल्फी, एल्फ मेकर, ओली अंडर द सी, एल्फ स्की, गंबॉल टिल्ट, प्रेझेंट बाउंस, स्नोबॉल स्टॉर्म, पेंग्विन डिश सारखे अनेक गेम वेबसाइटवर सुरू केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘New Year 2022’ च्या पिकनिकचा प्लॅन रद्द करताय? मग थोडं थांबा, जाणून घ्या ‘ही’ पाच ठिकाणं जिथं ओमिक्रॉनचं टेन्शन नसणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -