घरट्रेंडिंगTrending : काय बोलता ! आता बाजारात मिळणार 'पुष्पा'च्या साड्या

Trending : काय बोलता ! आता बाजारात मिळणार ‘पुष्पा’च्या साड्या

Subscribe

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाल्यानंतर साड्यांची मागणी प्रचंड वाढली असून दुकानदार आता केवळ पुष्पाच्या प्रिंटेड साड्याच तयार करत आहेत.

Trending  News :  अल्लू अर्जुनच्या पुष्पा : द राइज या सिनेमाचा सध्या सर्वत्र बोलबाला सुरू आहे. सिनेमाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रिल्सवर देखील श्रीवंलीने हल्लाबोल केलाय. सिनेमा रिलीज होऊन दोन महिने झाले असले तरी प्रेक्षकांच्या मनावर पुष्पाचा राज बेकरार आहे. मात्र पुष्पाची क्रेझ काही कमी झालेली नाहीये. सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यानंतर पुष्पाने थेट बाजारात उडी घेतली आहे. पुष्पाच्या प्रिंट असलेल्या साड्या बाजारात आल्या आहेत.

गुजरातच्या सुरत मार्केटमध्ये पुष्पाच्या प्रिटेड डिझाइनर साड्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. साडीवर पुष्पा सिनेमाचे पोस्टर छापण्यात आले आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

सूरत येथील कपडा बाजारात देशातील सर्वांत व्हरायटी फॉफ कपडे पाहायला मिळतात. सूरज बाजारपेठेतील चरणजीत क्रिएशन नामक एका दुकानात पुष्पाच्या पोस्टर प्रिंटेंड साड्या तयार करण्यात आल्या आहेत. या साड्यांना सध्या प्रचंड मागणी असून अनेक जण साड्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाल्यानंतर साड्यांची मागणी प्रचंड वाढली असून दुकानदार आता केवळ पुष्पाच्या प्रिंटेड साड्याच तयार करत आहेत.

- Advertisement -

दुकानदार चरणपाल सिंह यांनी सांगितले की, सूरजमध्ये सध्या पुष्पाच्या साड्यांची मागणी वाढली आहे. केवळ सूरतच नाही राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड सारख्या राज्यांतूनही पुष्पाच्या साड्यांना मागणी आहे. सूरत मार्केटमध्ये याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्याचे थ्री डी प्रिंटेड साड्या बनवल्या होत्या.


हेही वाचा – Promise Day च्या दिवशी जोडीदाराला द्या ‘ही’ खास वचनं अन् नातं करा…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -