Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग कोरोनाचा नियम मोडला, महिलेला दंड म्हणून केलं किस, व्हिडीओ झाला व्हायरल

कोरोनाचा नियम मोडला, महिलेला दंड म्हणून केलं किस, व्हिडीओ झाला व्हायरल

महिलीने कोरोनाचे नियम मोडले म्हणून तिला योग्य ती कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसाने महिलेला किस करुन तिला सोडून दिले.

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा फैलाव झाल्यापासून सर्वांना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र अनेक जण नियम धाब्यावर बसवून रॉयल कारभार करताना दिसत असतात. नियम मोडल्याने पोलिसांनीही शक्कल लावून अनेक भन्नाट शिक्षा दिल्या आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र नियम मोडल्यावर शिक्षा न करता थेट किस करुन महिलेला सोडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याचा घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका टिव्हि चॅनलने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केले आहे. महिलीने कोरोनाचे नियम मोडले म्हणून तिला योग्य ती कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसाने महिलेला किस करुन तिला सोडून दिले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस महिलेला नोट पॅडमध्ये तिची सर्व माहिती भरण्यास सांगत आहे. त्यानंतर अचानक पोलिस महिलेला जवळ ओढतो आणि किस करतो. व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

पेरु या देशातील हा प्रकार आहे. रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद करण्यात आली. कोरोनासंदर्भात असलेले नियम तोडताना पोलीसाने महिलेला पकडले. तिच्याकडून दंड वसूल करण्यासाठी तिला पोलिसाने थांबवले. पोलीस महिलेला दंड आकारताना महिला पोलिसाच्या जवळ जाते. जवळ आलेल्या महिलेकडून दंड आकारण्याऐवजी पोलिसाने महिलेला तिचा मास्क काढायला सांगितले. महिलेने मास्क काढताच पोलिसांने महिलेला किस केले. महिलाही पोलिसाला प्रतिसाद देताना दिसत आहे. हा सर्व प्रकार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. पोलिसाचे नाव समोर येऊ शकले नाही. मात्र त्या पोलिसाचा या आधीचा रेकॉर्ड चांगला असल्याचे सांगितले आहे. महिलेने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लघन केल्याप्रकरणी महिलेवर दंड आकारण्यात येत होता. त्याचवेळी हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड तिच्या आईबरोबर पसार

- Advertisement -