Viral Video: कोरोनाबाधित ९५ वर्षांच्या आजीबाईंनी ऑक्सिजनसह बेडवर केला गरबा

Corona positive grandmother garbled on hospital bed, video went viral
Viral Video: कोरोनाबाधित ९५ वर्षांच्या आजीबाईंनी ऑक्सिजनसह बेडवर केला गरबा

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातला आहे. दररोज चार हजारांहून अधिक जण कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत. तर ३ लाखांहून अधिक जण कोरोनाचे शिकार होत आहेत. अशा भयावह परिस्थिती पॉझिटिव्ह राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आपण अनेक डॉक्टर्स, नर्सेस, रुग्ण पॉझिटिव्ह राहण्यासाठी कोविड वॉर्डमध्ये डान्स करताना पाहिले आहे. अशाच प्रकारचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ९५ वर्षांच्या आजीबाई गरबा खेळताना दिसत आहे.

९५ वर्षांच्या या आजीबाईंना कोरोनाची लागण झाली आहे, तरी त्या गरबा बेड्वर गरबा खेळताना दिसत आहेत. फोटोग्राफर विरल भयानीने या ९५ वर्षीय आजीबाईंचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कोरोनाबाधित असल्यामुळे आजीबाईंना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृद्ध आणि आजारी असूनही आजीबाई ऑक्सिजन मास्क घालून बेडवर गरबा खेळताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘राजकोटची ९५ वर्षीय आजीबाई पॉझिटिव्ह आहे आणि आम्हाला त्यांची लढाऊ भावना दिसत आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर आजीबाईंचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील युझर्स आजीबाईची प्रकृती बरी होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. एका युझरने लिहिले आहे की, ‘ईश्वर त्यांना चांगले आरोग्य देईल.’


हेही वाचा – कोरोना रुग्णाचा ऑक्सिजन काढून महिला लागल्या पूजा करायला!, व्हिडिओ व्हायरल